Weather Updates : पावसाच्या सरी Weekend गाजवणार, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, देशात कसं असेल हवामान?

Weather Updates : हवमान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार देशातील काही भागात तापमानात वाढ नोंदवली जाणार आहे, तर काही भागात पावसाची हजेरी असणार आहे. तुमच्या भागात नेमकी काय परिस्थिती? पाहा...   

Updated: Mar 29, 2023, 07:50 AM IST
Weather Updates : पावसाच्या सरी Weekend गाजवणार, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, देशात कसं असेल हवामान?  title=
weather update rain and snowfall predictions latest Marathi news

Latest Weather News : मार्च महिन्याची अखेर होत असतानाच पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांमद्ये हवामान काही अंश बदलण्यच्या तयारीत दिसत आहे. बहुतांश भागांतून पाऊस काही काढता पाय घेण्याचं नाव घेत नसल्यामुळं अवकाळीचं संकट मात्र कायम आहे. यातच काही राज्यांमध्ये तापमानात वाढ अपेक्षित असल्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. (weather update rain and snowfall predictions latest Marathi news )

कुठे पडेल पाऊस...? 

दक्षिण भारतामध्ये पुढील पाच ते सहा दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ या भागांत पावसामुळं हवेत गारवा पसरलेला असेल. सर्वत्र हिरवळ बहरून अल्हाददायक वातावरण यामुळं पाहायला मिळेल. महाराष्ट्रातही विदर्भ आणि नजीकचा भाग वगळता राज्यातील बहुतांश भागांना उन्हाचा तडाखा बसणार आहे. 

या व्यतिरिक्त पश्चिम बंगालचा किनारपट्टी भाग, ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी इतक्या वेगानं वारे वाहतील. सोबतच पावसााच्या सरीही बरसतील. तर, देशाची राजधानी दिल्ली मात्र उष्णतेच्या झळा सोसताना दिसेल. 

हेसुद्धा वाचा : EPFO Updates : पीएफबाबत मोठी बातमी, व्याजाचा दर 8.15 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय

 

30 - 31 मार्च पूर्वी दिल्ली आणि नजीकच्या भागांमध्ये उष्णतेची लाट येईल. पण, मार्च महिन्याची अखेर मात्र पावसानं होणार आहे. पुढे काही दिवसांसाठी हेच वातावरण टिकून राहील. 

अफगाणिस्तानातील वाऱ्यांचा भारतावर परिणाम... 

अफगाणिस्तान आणि त्यानजीकच्या भागावरून पश्चिमी झंझावात आणि चक्रीवादळसदृश वारे तयार होताना दिसत आहेत. ज्यामुळं हे वारे आणि झंझावात भारताच्या दिशेनं वळून देसभरात पुन्हा एकदा हवामानात लक्षणीय बदल नोंदवले जाऊ शकतात. याचे थेट परिणाम जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगढ, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश यांसह इतरही राज्यांवर दिसून येणार आहे. 

स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांच अरुणाचल प्रदेशातही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. तर, पर्वतीय भाग म्हणजेच भारत तिबेच सीमेलगत असणारा प्रदेश, जम्मू काश्मीरचा काही भाग, लडाख येथे बर्फवृष्टी होऊ शकते. त्यामुळं बदलणारं हे हवामान पाहता त्याला सामोरं जाण्यासाठी सज्ज व्हा.