मुंबई : आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. याकरता अनेकजण होम लोन घेतात. मात्र तुम्ही कधी पाहिलं आहे का? ज्या बँका आपल्याला घरांसाठी लोन देतात त्या बँका स्वतः भाड्याच्या ऑफिसमध्ये असतात. खूप कमी आणि काही मोठ्या किंवा रिझनल ऑफिस ब्रांच या स्वतःच्या जागेत असतात. त्यामुळे अनकदा असा प्रश्न पडतो की, दुसऱ्यांच्या घरांना होम लोन देणाऱ्या बँकांकडे मात्र स्वतःच हक्काची अशी जागा नाही.
स्वतःच हक्काचं घर घेण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणं अतिशय फायदेशीर असते? हे खरं आहे का. भारतात आपलं स्वतःचं हक्काचं घर असणं ही खूप अभिमानाची गोष्ट समजली जाते.
यामुळे त्या व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते. असा अनेकांचा समज आहे. मात्र बँक देखील प्रॉपर्टीच्या आधारावरच लोन देतं.
बँकेच्या पॉलिसीमध्ये काही नियम नसतो. पण बँकांचं ऑफिस कायमच भाड्याच्या जागेत का असतं.
खरं म्हणजे ही खूप जुनी परंपरा आहे. महत्वाचं म्हणजे बँका या नियमाचं काटेकोरपणे पालन करतात.
सुरूवातीला जेव्हा बँका सुरू झाल्या तेव्हा त्या भाड्याच्या जागेवरच सुरू करण्यात आला. त्यानंतर बँकांनी आपली परंपरा कायमच ठेवली.
कमी व्याजावर पैसे घेणं आणि जास्त व्याजदरावार पैसे देणं हे बँकाचे मुख्य काम आहे. त्यामुळे बँका खातेदारकांचे पैसे स्थायी संपत्तीवर गुंतवत नाहीत. यामुळे बँका कायमच प्रयत्न करतात की, भाड्याच्या जागेवर ऑफिस सुरू करावे.
अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, बँकांनी याबाबत पॉलिसी बनवणे गरजेचे आहे. बँकांचे ऑफिस भाड्याच्या ठिकाणी सुरू करणे गरजेचे नाही.
गावांमध्ये ग्राम पंचायत आणि अंगणवाडीची मोठी जागा असते. तेथे बँका आपलं कार्यालय सुरू ठेवू शकतात.