close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चंद्रकांत पाटलांनी युती धर्मावरून शिवसेनेला फटकारले

 महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी युती धर्मावरून शिवसेनेला फटकारले आहे. 

Updated: Oct 11, 2019, 07:57 PM IST
चंद्रकांत पाटलांनी युती धर्मावरून शिवसेनेला फटकारले

कोल्हापूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी युती धर्मावरून शिवसेनेला फटकारले आहे. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी युती धर्म पाळत भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांना पाठिंबा द्या असे आवाहन त्यांनी केले आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. महाडिक यांनी आपली चूक सुधारावी अन्यथा एका लुगडयानी बाई म्हातारी होत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना गर्भित इशारा दिला आहे. दसऱ्या दिवशी घरी न जेवता शिवसेनेचे उमेदवार प्रकाश अबिटकर यांच्या प्रचाराचा नारळ फोडायला गेलो. आम्हाला युती धर्म शिकवू नका असे त्यांनी म्हटले. 

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता खाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमचं ठरलंय वर शरद पवार यांनी म्हटलं होतं आम्ही बी ध्यानात ठेवलं आहे. शरद पवार यांनी आत्ता सतेज पाटील यांच्या विरोधात प्रचार करावा असा टोलाही त्यांनी लगावला आहे.