Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी पाहा एकाच क्लिकवर...

Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. याच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी आज निकालाच्या दिवशी दिवसभर या लिंकवर पाहता येणार आहे. राज्यात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणी उधळला विजयाचा गुलाल तर कोणाला पहावं लागलं पराभवाचं तोंड? या साऱ्या अपेड्ट या एकाच लिंकवर उपलब्ध असून लाइव्ह अपेड्टसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

4 Jun 2024, 10:58 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: धुळ्यात भाजपा काँग्रेसला पडली भारी

धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसला 99994 मतं तर भाजपाला एक लाख 5272 मतं मिळाली आहेत. तिसऱ्या फेरीत भाजप 5288 मतांनी पुढे आहे. काँग्रेसचा 7000 चा लीड तोडत भाजपची आघाडी.

4 Jun 2024, 10:53 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: महाविकास आघाडीची मुसंडी; महायुतीला मोठा धक्का

महाविकास आघाडीने राज्यात मोठी मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडी 28 जागांवर आघाडीवर आहे. तर महायुती 20 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गट 11 जागांवरील आघाडीसहीत दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरतोय तर भाजपा सध्या 13 जागांसहीत सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. शिंदेग गट 6 जागांवर आघाडीवर आहे तर शरद पवार गटाने 5 जागांवर आघाडी मिळवली आहे. 

 

 

4 Jun 2024, 10:45 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: अमोल किर्तीकर आघाडीवर

उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल किर्तीकर 1152 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरुद्ध शिंदे गटाचे रविंद्र वायकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

4 Jun 2024, 10:40 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबईतून ठाकरे गटाच्या 'या' उमेदवाराला 10000+ ची आघाडी

ईशान्य मुंबईमधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे संजय दिना पाटील 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत. संजय दिना पाटील यांनी 10 हजार 304 मतांनी पुढे आहेत.

4 Jun 2024, 10:34 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: उत्तर मध्य मुंबईमधून गोयल आघाडीवर

उत्तर मध्य मुंबईमधून भाजपाचे पियुष गोयल आघाडीवर आहेत. त्यांना 23370 मतं मिळाली असून ते 12 हजार 352 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या भूषण पाटलांना 11 हजार 18 मतं मिळाली आहेत.

4 Jun 2024, 10:30 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: छत्रपती संभाजीनगर ठाकरे गटाचे खैरे तिसऱ्या क्रमांकावर

छत्रपती संभाजीनगरमधून एमआयएमचे इम्तियाज जलील हे 19745 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरेंना 11439 मतं मिळाली असून ते तिसऱ्या स्थानी आहेत. शिंदे गटाचे संदीपान भूमरे 16460 मतांसहीत दुसऱ्या स्थानी आहेत.

4 Jun 2024, 10:23 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: भिवंडीत शरद पवार गटाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर

भिवंडी मतदारसंघात कपिल पाटील 2653 मतांनी आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर निलेश सांबरे असून शरद पवार गटाचे बाळ्यामामा तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

4 Jun 2024, 10:18 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: उज्वल निकम आघाडीवर

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उज्वल निकम पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. 2697 मतांनी निकम आघाडीवर आहेत.

4 Jun 2024, 10:14 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates:  माढ्यात मोहिते पाटील आघाडीवर; तर बुलढाण्यात शिंदे गटाची आघाडी

माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील 9 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर बुलढाण्यामध्ये दुसऱ्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव 286 मतांनी आघाडीवर आहेत.

4 Jun 2024, 10:09 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: राहुल शेवाळे आघाडीवर

दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून राहुल शेवाळे आघाडीवर आहेत. राहुल शेवाळे यांना 10162 मतं मिळाली असून अनिल देसाईंना 3746 मतं मिळाली आहेत.