Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी पाहा एकाच क्लिकवर...

Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. याच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी आज निकालाच्या दिवशी दिवसभर या लिंकवर पाहता येणार आहे. राज्यात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणी उधळला विजयाचा गुलाल तर कोणाला पहावं लागलं पराभवाचं तोंड? या साऱ्या अपेड्ट या एकाच लिंकवर उपलब्ध असून लाइव्ह अपेड्टसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

4 Jun 2024, 06:04 वाजता

7 मे रोजी 11 मतदारसंघांत पार पडलेलं तिसऱ्या टप्प्यातील मतदान

तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 11 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं होतं. या टप्प्यामध्ये 7 मे रोजी रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये मतदान झालं होतं.

4 Jun 2024, 06:03 वाजता

दुसऱ्या टप्प्यात 8 मतदारसंघांमध्ये मतदान

राज्यातील दुसऱ्या टप्प्यात एकूण 8 मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान झालं होतं. या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी मतदारसंघांमध्ये मतदान झालं.

4 Jun 2024, 05:58 वाजता

पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघांमध्ये 55.29 टक्के मतदान

महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडलं होतं. या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं होतं. 55.29 टक्के मतदान या पाच मतदारसंघांमध्ये झालं होतं.

4 Jun 2024, 05:53 वाजता

नमस्कार वाचकांनो, महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे अशा जवळपास महिन्याभराहून अधिक काळ पार पडलेल्या पाच टप्प्यांमधील मतदानानंतर आज निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्रातील या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. याच निकालाचे सर्व अपेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.