Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी पाहा एकाच क्लिकवर...

Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. याच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी आज निकालाच्या दिवशी दिवसभर या लिंकवर पाहता येणार आहे. राज्यात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणी उधळला विजयाचा गुलाल तर कोणाला पहावं लागलं पराभवाचं तोंड? या साऱ्या अपेड्ट या एकाच लिंकवर उपलब्ध असून लाइव्ह अपेड्टसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

4 Jun 2024, 13:25 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: सोलापूरमधून प्रणिती शिंदेंना 1 लाखांहून अधिकची आघाडी

दहाव्या फेरीनंतर प्रणिती शिंदेंची 10705 मतांनी आघाडी. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 270650  मते मिळाली असून भाजपच्या राम सातपुते यांना 259945 मतं मिळाली आहेत.

 

4 Jun 2024, 13:14 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: शिर्डीत ठाकरेंचा उमेदवार आघाडीवर

शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंना एकूण 1 लाख 86 हजार 721 मते मिळाली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना एकूण 1 लाख 67 हजार 819 मते मिळाली आहेत. आठव्या फेरीनंतर भाऊसाहेब वाकचौरे 18902 मतांनी आघाडीवर आहेत. तर वचिंतच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना नऊ फेऱ्यात एकूण 40420 मते मिळाली आहेत. हा निकाल हा राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासाठी हे कल धक्कादायक मानले जात आहेत.

4 Jun 2024, 13:07 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: उदयनराजेंची आघाडी; 4 हजार मतांनी घेतलं लीड

साताऱ्यामध्ये उदयराजे भोसलेंनी 4 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. शशिकांत शिंदेंची आघाडी मोडून काढत घेतली मुसंडी. चौदाव्या फेरीनंतर उदयनराजेंची आघाडी.

4 Jun 2024, 13:04 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: भंडाऱ्यात काँग्रेसची आघाडी

भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात काँग्रेसची आघाडी

काँग्रेस-  प्रशांत पडोळे - 149768
भाजपा - सुनिल मेंढे 148303
काँग्रेसने 1465 मतांनी आघाडी घेतली आहे.

4 Jun 2024, 13:00 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: वर्ध्यातून अमर काळे आघाडीवर

वर्ध्यातून अमर काळे यांना 31603 मतांची आघाडी घेतली आहे. अमर काळे यांना 204845 मते तर रामदास तडस यांना 173242 मते मिळाली आहेत. अमर काळे यांची आघाडी कायम आहे.

4 Jun 2024, 12:58 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: रावेरमधून रक्षा खडसे आघाडीवर

सातवी फेरीतील मतमोजणी पूर्ण झाली असून रावेर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या रक्षा खडसेंना 183968 मतं मिळाली असून महाविकास आघाडीच्या श्रीराम पाटलांना 110283 मतं मिळाली आहेत. रक्षा खडसे 73 हजार 685 मतांनी आघाडीवर आहेत.

4 Jun 2024, 12:56 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील आठव्या फेरी अखेर 28 हजार 783 मतांनी आघाडीवर आहेत.

4 Jun 2024, 12:45 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: नवनीत राणा आघाडीवर; 9000+ आघाडी

अमरावती भाजप उमेदवार नवनीत राणा 9442 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांना आतापर्यंत मिळाले 130169 मते मिळाली आहेत. नवनीत राणा यांना आतापर्यंत मिळाले 139611 मतं मिळाली आहेत.

 

4 Jun 2024, 12:45 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: भंडाऱ्यात काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर

भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात काँग्रेसने आघाडी घेतली काँग्रेसचे पडोळे 317 मतांनी आघाडीवर आहेत.

काँग्रेस-  प्रशांत पडोळे - 141526 मतं
भाजपा - सुनिल मेंढे - 141209 मतं

4 Jun 2024, 12:34 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मुसंडी

अकराव्या फेरीत देखील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची आघाडी कायम आहे. राजाभाऊ वाजे यांना आत्तापर्यंत 3 लाख 9 हजार 410 मतं मिळाली आहेत. राजाभाऊ वाजे यांनी 1 लाख 3673 मतांनी आघाडी घेतली आहे. 11 व्या फेरीनंतर राजाभाऊ वाजेंना 3 लाख 9410 मतं मिळाली आहेत. तर शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना 2 लाख 5 हजार 734 मतं मिळाली आहेत.