Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी पाहा एकाच क्लिकवर...

Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. याच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी आज निकालाच्या दिवशी दिवसभर या लिंकवर पाहता येणार आहे. राज्यात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणी उधळला विजयाचा गुलाल तर कोणाला पहावं लागलं पराभवाचं तोंड? या साऱ्या अपेड्ट या एकाच लिंकवर उपलब्ध असून लाइव्ह अपेड्टसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

4 Jun 2024, 08:19 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मावळ, जालन्यातून महायुतीचे उमेदवार आघाडीवर

मावळ मतदारसंघातील पोस्टल मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच जालन्यामधून महायुतीचे रावसाहेब दानवे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.

4 Jun 2024, 08:17 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: चंद्रकांत खैरे आघाडीवर तर मुनगंटीवार पिछाडीवर

छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे टपाली मतांमध्ये आघाडीवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत.

4 Jun 2024, 08:10 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: बारामतीमधून पहिला कल हाती; सुप्रिया सुळे आघाडीवर

बारामतीमधून पाहिला कल हाती आला असून पोस्टल मतदानामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

4 Jun 2024, 08:08 वाजता

Mumbai Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबईतील पहिले कल हाती

उत्तर मुंबई मतदारसंघातून पियूष गोयल आघाडीवर असल्याचे प्राथमिक कल समोर आले आहेत.

4 Jun 2024, 08:07 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: महाराष्ट्रातील पहिले कल हाती; भाजपा आघाडीवर

राज्यातल्या पहिल्या दोन जागांचे कल हाती आले आहेत. महाराष्ट्रामध्ये दोन जागांवर भाजपा आघाडीवर असल्याचं प्राथमिक कल दर्शवत आहे.

 

4 Jun 2024, 07:58 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मतमोजणीला सुरुवात! राज्यातील पहिला कल लवकरच हाती येणार

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांमधील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा पोस्टल व्होट्सची मोजणी करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

4 Jun 2024, 07:46 वाजता

Kalyan Lok Sabha Election 2024 Result Live Updates: कल्याण मतदारसंघात मतदान वाढल्याने तर्क-वितर्कांना उधाण

कल्याण लोकसभा मतदारसंघात 20 लाख 18 हजार 958 मतदार होते त्यामध्ये 50.12 टक्के मतदान झालं. म्हणजेच 10 लाख 43 हजार 610 मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. मतदानाची टक्केवारी वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून या लोकसभा मतदारसंघातील निकालाबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात असले तरी ही लढत एकतर्फी किंवा चुरशीची होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार असून त्यानंतर विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. या मतदानसंघातून मुख्यमंत्री सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असून त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर उभ्या आहेत.

4 Jun 2024, 07:43 वाजता

Kalyan Lok Sabha Election 2024 Result Live Updates: कल्याणमध्ये मतमोजणीच्या 29 फेऱ्या, 84 टेबल अन् 600 अधिकारी

कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदानाची मोजणी 29 फेऱ्यामध्ये होणार असून यासाठी 84 टेबलवर एकाच वेळी मोजणी सुरु केली जाणार आहे. मतमोजणीसाठी 600 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून पोलीस यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचं आवाहन आहे.

4 Jun 2024, 07:41 वाजता

Yavatmal Washim Lok Sabha Election 2024 Result Live Updates: यवतमाळ-वाशिममध्ये मतमोजणीसाठी 800 कर्मचारी; विशेष सुरक्षा

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. 800 कर्मचारी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील केंद्रांवर मतमोजणीचं काम करणार आहे. मतदानकेंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून मतमोजणी असलेल्या शासकीय धान्य गोदाम मार्गावरील वाहतूक देखील एकेरी करण्यात आलेली आहे. 

4 Jun 2024, 07:36 वाजता

Chandrapur Lok Sabha Election 2024 Result Live Updates: चंद्रपूरमध्ये 400 कर्मचारी करणार मतमोजणी; केंद्राला ट्रीपल लेअर सिक्युरिटी

देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सकाळी सातपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून मुख्य मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी 84 टेबल वर ईव्हीममधील मतमोजणी होईल तर 20 टेबलवर पोस्टल बलेटची मतमोजणी होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतमोजणीच्या एकूण 31 फेऱ्या होणार आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध भाजपा अशी थेट लढत पहायला मिळणार आहे.