Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. याच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी आज निकालाच्या दिवशी दिवसभर या लिंकवर पाहता येणार आहे. राज्यात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणी उधळला विजयाचा गुलाल तर कोणाला पहावं लागलं पराभवाचं तोंड? या साऱ्या अपेड्ट या एकाच लिंकवर उपलब्ध असून लाइव्ह अपेड्टसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...
4 Jun 2024, 09:57 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: दुसऱ्या फेरीअखेरीस सुनील तटकरे आघाडीवर
रायगड - दुसऱ्या फेरीअखेरीस सुनील तटकरे 5 हजार 400 मतांनी आघाडीवर आहेत.
4 Jun 2024, 09:44 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: शिर्डीमधून महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीनंतर भाऊसाहेब वाकचौरे 5500 मतांनी आघाडीवर आहेत. संगमनेर, अकोले आणि कोपरगावमध्ये वाकचौरे यांना आघाडी मिळाली आहे.
4 Jun 2024, 09:44 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: नगरमध्ये सुजय विखे पाटील आघाडीवर
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील आघाडीवर आहेत. 190 मतांनी सुजय विखे आघाडीवर असून शरद पवार गटाच्या निलेश लंकेंना 18254 मतं पडली आहेत. सुजय विखे पाटील यांना 18444 मतं मिळाली आहेत.
4 Jun 2024, 09:31 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: प्रकाश आंबेडकर पिछाडीवर; काँग्रेस उमेदवार आघाडीवर
अकोल्यातून प्रकाश आंबेडकर पिछाडीवर. दुसऱ्या फेरीत काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर आहेत.
4 Jun 2024, 09:22 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: नागपूरमधून नितीन गडकरी 11 हजार मतांनी आघाडीवर
नागपूरमधून नितीन गडकरींना पहिल्या काही फेऱ्यांमध्ये 40,644 मतं पडली असून विकास ठाकरेंना 29625 मतं मिळाली आहेत. नितीन गडकरी 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
4 Jun 2024, 09:18 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: सुप्रिया सुळे 6941 मतांनी आघाडीवर; सुनेत्रा पवार पिछाडीवर
बारामतीमधून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे 6941 मतांनी आघाडीवर आहेत. अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.
4 Jun 2024, 09:08 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: शरद पवार गटाचे अमोल कोल्हे 9553 मतांनी आघाडीवर
शिरुर मतदारसंघातून दुसऱ्या फेरीच्या अखेर अमोल कोल्हेंना 9553 मतांची आघाडी मिळाली आहे. या मतदारसंघातून अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर पडले आहेत.
4 Jun 2024, 09:01 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: रायगडमधून सुनील तटकरे आघाडीवर
रायगडमधून सुनील तटकरेंनी आघाडी घेतली आहे. ठाकरे गटाचे अनंत गिते पिछाडीवर पडल्याचं चित्र दिसत आहे.
4 Jun 2024, 09:00 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: साताऱ्यात उदयराजे पिछाडीवर; शरद पवार गटाचा उमेदवार आघाडीवर
साताऱ्यामध्ये भाजपाचे उदयनराजे भोसले पिछाडीवर पडले असून शरद पवार गाटचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत.
4 Jun 2024, 08:57 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: बीडमधून पंकजा मुंडे पिछाडीवर
बीडमधून शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे आघाडीवर असून पंकजा मुंडे पिछाडीवर पडल्या आहेत.