Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी पाहा एकाच क्लिकवर...

Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. याच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी आज निकालाच्या दिवशी दिवसभर या लिंकवर पाहता येणार आहे. राज्यात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणी उधळला विजयाचा गुलाल तर कोणाला पहावं लागलं पराभवाचं तोंड? या साऱ्या अपेड्ट या एकाच लिंकवर उपलब्ध असून लाइव्ह अपेड्टसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

4 Jun 2024, 15:22 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: 'याहून वेगळा...' बारामतीच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

याहून वेगळा निकाल लागेल असं मला वाटलं नव्हतं. बारामती हा गेल्या 60 वर्षांपासून मी मतदारसंघातून लढतोय. माझी सुरुवात तिथे झाली. तिथल्या मतदाराचे मूलभूत प्रश्न मी ओळखतो. ते योग्य निर्णय घेतात. 

4 Jun 2024, 15:11 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: राष्ट्रवादीच्या विजयाचं श्रेय पवारांनी काँग्रेस, ठाकरेंना दिलं

या निवडणुकीत अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली मर्यादीत जागा लढवल्या. त्यापैकी आम्ही 7 जागेंवर आज आम्ही पुढे आहोत. 10 जागा लढून 7 विजय म्हणजे आमचा स्ट्रायकिंग रेट उत्तम आहे. हे यश मिळालं आहे. हे यश एकट्या राष्ट्रवादीचं यश आहे असं आम्ही मानत नाही. हे आघाडीचं यश आहे. काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं एकत्रित काम केलं. त्यामुळे हे यश आमच्याप्रमाणे काँग्रेसलाही मिळालं. हेच यश उद्धव ठाकरेंना मिळालं. परिवर्तनाचं वातावरण आहे. आम्ही तिघेही एकत्रित राहू. उद्याच्या काळात आमची धोरणं ठरवून महाराष्ट्राच्या जनतेची काळजी घेण्याची खबरदारी घेऊ. उद्याची बैठक संध्याकाळी ठरेल. त्यात माझी उपस्थिती असेल.

4 Jun 2024, 15:02 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: '...म्हणून राज्यात महाविकास आघाडीचा विजय झाला'; सुनील तटकरेंची कबुली

"यावेळी सर्व पक्ष नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले होते तरी देशातील जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही ही वस्तुस्थिती मान्य आहे. महविकास आघाडीने ज्या पद्धतीने ग्राम पातळीवर कार्यकर्त्यांची फळी अगदी सुरवातीपासून तयार केली. दुर्दैवाने तशी फळी तयार करण्यात आम्ही अपयशी ठरलो. यावेळी झालेल्या चुका आम्ही सुधारू. राष्ट्रवादी काँगेसने यावेळी 4 जागा लढवल्या त्यातील एकच जिंकलो. हे अपयश का मिळालं याचं आम्ही आत्मपरीक्षण करू," असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.

4 Jun 2024, 14:56 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मी सर्वांचा ऋणी आहे; सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया

"महायुती मधील सर्व घटक पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, विकासाच्या मुद्द्यावर लढवलेली निवडणूक याला इथल्या जनतेने साथ दिली. मी रायगड, रत्नागिरी मधील जनतेचा ऋणी आहे. त्यांचे ऋण मी कधीच विसरणार नाही. महायुतीला कोकणात मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून यापुढे काम करणार आहे. केवळ लोकसभेपुरता नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात सर्व जागा जिंकून आणण्याचा निर्धार करतो आहे," असं रायगडमधील अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

4 Jun 2024, 14:49 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: राज्यातील भाजपाचा पहिला विजय! 1.36 लाख मतांनी मविआच्या उमेदवाराला पाडलं

जळगावमधून महायुतीच्या उमेदवार असलेल्या स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत. भाजपच्या स्मिता वाघ जळगाव लोकसभेतून जिंकल्या असून त्यांनी 1 लाख 36 हजार 251 मतांनी विजय मिळवला आहे. स्मिता वाघ यांना 4 लाख 83 हजार 748 मतं मिळाली. तर महाविकास आघाडीच्या करण पवार यांना 2 लाख 95 हजार 782 मतं मिळाली. एकूण 17 फेऱ्यांमध्ये 11 लाख 65 हजार 968 मतांची मोजणी करण्यात आली.

4 Jun 2024, 14:37 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबईतून ठाकरे गटाचा पहिला विजय

मुंबईतील दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या अनिल देसाई विजयी झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे पराभूत झाले आहेत.

4 Jun 2024, 14:21 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: अमरावतीमधून नवनीत राणा 31338 मतांनी पिछाडीवर

अमरावती काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे 31338 मतांनी आघाडीवर आहेत. बळवंत वानखडे यांना आतापर्यंत 271246 मते मिळाली आहेत. तर नवनीत राणा यांना आतापर्यंत 239908 मतं मिळाली आहेत.

4 Jun 2024, 14:12 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: शरद पवारांची 3 वाजता पत्रकार परिषद; उद्धव ठाकरे 4 वाजता साधणार संवाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. तर चार वाजता उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. पाच वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद होणार आहे.

4 Jun 2024, 13:57 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: महाराष्ट्रातला पहिला निकाल हाती! BJP उमेदवार जिंकला! शरद पवार गटाच्या उमेदवार पराभूत

उदयनराज भोसलेंनी सातारा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदेंचा पराभव केला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असताना उदयनराजेंनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला. विजयानंतर उदयनराजे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

 

4 Jun 2024, 13:49 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबईतून ठाकरे गटाचे चारही उमेदवार आघाडीवर; सेना भवनात उधळला गुलाल

मुंबईमधून ठाकरे गटाचे चारही उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. यानिमित्ताने शिवसैनिकांनी सेना भवनात गुलाल उधळून आनंद साजरा केला.