Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी पाहा एकाच क्लिकवर...

Maharashtra Election LIVE: - बीडमध्ये धक्कादायक निकाल! भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे विजयी

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. याच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी आज निकालाच्या दिवशी दिवसभर या लिंकवर पाहता येणार आहे. राज्यात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणी उधळला विजयाचा गुलाल तर कोणाला पहावं लागलं पराभवाचं तोंड? या साऱ्या अपेड्ट या एकाच लिंकवर उपलब्ध असून लाइव्ह अपेड्टसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

4 Jun 2024, 07:32 वाजता

Bhandara-Gondiya Lok Sabha Election 2024 Result Live Updates:

देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी सात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. सकाळी सातपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून मुख्य मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी 84 टेबल वर ईव्हीममधील मतमोजणी होईल तर 20 टेबलवर पोस्टल बलेटची मतमोजणी होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या एकूण 31 फेऱ्या होणार आहेत. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध भाजपा अशी थेट लढत पहायला मिळणार आहे.

4 Jun 2024, 07:26 वाजता

Kalyan Lok Sabha Election 2024 Result Live Updates: कल्याणमधून मशालच लोकसभेत जाणार; वैशाली दरेकर

कल्याण मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ठाकरे गटाच्या उमदेवार वैशाली दरेकर यांनी मतमोजणी केंद्रात सकाळीच दाखल झाल्या आहेत. 'जनतेनं पेपर लिहिला असल्याने धाकधूक नाही मात्र उत्सुकता कायम आहे. या मतदारसंघातून मशाल लोकसभेत जाणार,' अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी  सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नोंदवली.

4 Jun 2024, 07:25 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: अमरावतीमध्ये नवनीत राणा साईचरणी; सकाळीच घेतलं देवदर्शन

अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी आज सकाळी साई मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं. नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखेडे असा थेट सामना आहे. या मतदारसंघातून प्रहार संघटनेचे दिनेश बूब तसेच वंचितकडून आनंदराज आंबेडकर निवडणूक लढवत आहे.

4 Jun 2024, 07:07 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: निकालाआधीच विनायक राऊतांच्या विजयाची पोस्टर

कोकणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुद्ध रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयाचे पोस्टर्स त्यांच्या दिल्लीतील घराबाहेर झळकले आहेत. विशेष म्हणजे निकाल लागण्याआधीच कार्यकर्त्यांना विनायक राऊत यांचं अभिनंदन करणारे हे पोस्टर्स झळकावले आहेत.

4 Jun 2024, 06:52 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: 'शरद पवार गटाला 8 तर महाविकास आघाडीला 31 ते 32  जागा मिळतील'

'शिरुर मतदारसंघात नक्कीच तुतारी वाजेल. शरद पवार गटाने लढवलेल्या 10 जागांपैकी किमान आठ जागा तरी निवडून येतील असा विश्वास आम्हाला आहे,' असं शिरुरमधून निवडणूक लढवणारे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. तसेच या जागा वाढूही शकतील असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत. तसेच महाविकास आघाडीला किमान 31 ते 32 जागा मिळतील, असा विश्वासही कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. 

 

4 Jun 2024, 06:38 वाजता

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: 2019 मध्ये कसा लागलेला लोकसभा निवडणुकीचा निकाल?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने लढवलेल्या 25 जागांपैकी 23 जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, भाजपाचा पूर्वीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने 23 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी आघाडीतील घटकपक्ष म्हणून 19 जागा लढवून 4 विजय मिळवले. 2019 च्या लोकसभा निकालाने लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील भाजपचे वर्चस्व अधोरेखित केले होते.

4 Jun 2024, 06:29 वाजता

Mumbai Election Result Live Updates: मुंबईच्या प्रवेशद्वारांवर पोलिसांचा जागता पहारा

लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रवेश करणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांवर नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी रात्रीपासूनच सुरु आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारांवर सुरक्षेत मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही दृष्यं इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील आहेत.

4 Jun 2024, 06:25 वाजता

Mumbai Election Result Live Updates: मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त

मुंबईसहीत राज्यातील सर्वच मतमोजणी केंद्रांवर सोमवार रात्रीपासूनच कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विक्रोळीमधील मतदान केंद्रावरील ही दुष्यं...

4 Jun 2024, 06:10 वाजता

पाचवा टप्पा ठरला मतदानाचा सर्वात मोठा टप्पा

महाराष्ट्रातील मतदानाचा पाचवा टप्पा हा सर्वात जास्त मतदारसंघ असलेला टप्पा ठरला. 20 मे रोजी झालेल्या मतदानामध्ये या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाण्यासहीत मुंबईतील सहा मतदारसंघांचा समावेश होता. मुंबईतील उत्तर मुंबई , उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर – मध्य मुंबई, दक्षिण – मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघांमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान झालं.

4 Jun 2024, 06:07 वाजता

चौथ्या टप्प्यात पुण्यासहीत 11 मतदारसंघांमध्ये झालं मतदान

चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडलं होतं. या टप्प्यात एकूण 11 मतदारसंघांचा समावेश होता. ज्यामध्ये नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी तसेच बीड मतदारसंघाचा समावेश होता.