Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. याच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी आज निकालाच्या दिवशी दिवसभर या लिंकवर पाहता येणार आहे. राज्यात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणी उधळला विजयाचा गुलाल तर कोणाला पहावं लागलं पराभवाचं तोंड? या साऱ्या अपेड्ट या एकाच लिंकवर उपलब्ध असून लाइव्ह अपेड्टसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...
4 Jun 2024, 08:55 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: 44 ठिकाणाचे प्राथमिक कल हाती
44 ठिकाणाचे प्राथमिक कल हाती आले आहेत. महाविकास आघाडी 22 जागांवर आघाडीवर दिसत आहे. दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारांनाही 22 जागांवर आघाडी मिळाल्याचं दिसत आहे.
4 Jun 2024, 08:52 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: सांगलीमध्ये विशाल पाटील आघाडीवर
सांगलीमधून अपक्ष उमेदवार असलेले विशाल पाटील आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.
4 Jun 2024, 08:51 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: नारायण राणे 700 मतांनी आघाडीवर
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे 700 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.
4 Jun 2024, 08:47 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: पंकजा मुंडे आघाडीवर; रावेरमधून रक्षा खडसेंची आघाडी
बीडमधून पंकजा मुंडेंनी प्राथमिक कलामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे तर दुसरीकडे रावेरमधून रक्षा खडसे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.
4 Jun 2024, 08:42 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: दिंडोरीमधून केंद्रीय मंत्री भारती पवार पिछाडीवर
दिंडोरीमधून भास्कर भगरे आघाडीवर असून केंद्रीय मंत्री भारती पवार पिछाडीवर पडल्याचं चित्र दिसत आहे.
4 Jun 2024, 08:38 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: गिते आघाडीवर; तटकरे पिछाडीवर
रायगडमधून ठाकरे गटाचे अनंत गिते आघाडीवर असून अजित पवार गटाचे सुनील तटकरे प्राथमिक कलामध्ये पिछाडीवर दिसत आहेत.
4 Jun 2024, 08:36 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: सोलापूरमधून प्रणिती शिंदे आघाडीवर
सोलापूरमधून प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. महायुतीचे राम सातपुते पिछाडीवर पडले आहेत.
4 Jun 2024, 08:31 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबईचे प्राथमिक कल - अरविंद सावंत, संजय दिना पाटील आघाडीवर
दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उत्तर-पूर्व मुंबई संजय दिना पाटील आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळे आघाडीवर असल्याचं प्राथमिक कल सांगतात.
4 Jun 2024, 08:27 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: कोल्हापूरातून शाहू महाराज तर रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे आघाडीवर
माढामधून धैर्यशिल मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराज आघाडीवर आहेत. सिंधूदूर्ग-रत्नागिरीमधून नारायण राणे आघाडीवर असल्यांचं चित्र पाहायला मिळत आहे.
4 Jun 2024, 08:21 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: पुण्यात भाजपाचे उमेदवार आघाडीवर; CM शिंदेंचे पुत्रही आघाडीवर
पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचं चित्र प्राथमिक कलांमध्ये दिसत आहे. कल्याणमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.