Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Live Updates in Marathi: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे. लोकसभेच्या एकूण 48 जागा असलेल्या महाराष्ट्रामध्ये 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडला. लोकांनी निवडून दिलेल्या सर्वोच्च सभागृहामध्ये पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कोणते 48 खासदार करणार हे आज स्पष्ट होणार आहे. याच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाचे सर्व अपडेट्स, आकडेवारी आज निकालाच्या दिवशी दिवसभर या लिंकवर पाहता येणार आहे. राज्यात कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर, कोणी उधळला विजयाचा गुलाल तर कोणाला पहावं लागलं पराभवाचं तोंड? या साऱ्या अपेड्ट या एकाच लिंकवर उपलब्ध असून लाइव्ह अपेड्टसाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...
4 Jun 2024, 12:24 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: पुण्यात सहाव्या फेरीनंतर मोहोळ आघाडीवर
पुण्यामध्ये सहाव्या फेरी अखेरीस महायुतीचे मुरलीधर मोहोळ 37693 मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहेत. मोहोळ यांच्याविरोधात काँग्रेसचे रविंद्र धंगेकर निवडणूक लढवत आहेत.
4 Jun 2024, 12:15 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: भिवंडीत टप्प्यात कार्यक्रम... शरद पवार गटाच्या उमेदवाराची तिसऱ्यावरुन थेट पहिल्या स्थानी उडी
भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे 13393 मतांनी आघाडीवर आहेत. बाळ्या मामांविरोधात केंद्रीय ग्राम विकास मंत्री कपिल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे.
4 Jun 2024, 11:52 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: सुप्रिया सुळे बारामती 25 हजार मतांनी आघाडीवर
बारामतीमधून सुप्रिया सुळेंनी 25 हजार मतांनी आघाडीवर आहेत. अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.
4 Jun 2024, 11:50 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मुंबई उत्तर-पूर्व संजय दिना पाटील 8349 मतांनी आघाडीवर
संजय दिना पाटलांना 1 लाख 26 हजार 612 मतं तर मिहीर कोटेचा यांना 1 लाख 18 हजार 264 मतं मिळाली आहेत. संजय दिना पाटील 8349 मतांनी आघाडीवर आहेत.
4 Jun 2024, 11:27 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: कोल्हापूरमधून शाहू महाराज 25 हजार मतांनी आघाडीवर
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून चौथ्या फेरीनंतर शाहू महाराज छत्रपती हे 25 हजार 740 मताने आघाडीवर आहेत.
4 Jun 2024, 11:21 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: उदयनराजे भोसले 20 हजार मतांनी पिछाडीवर
पाचव्या फेरी अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे 20 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपाचे उदयनराजे भोसले पिछाडीवर पडले आहेत.
4 Jun 2024, 11:18 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: धुळ्यातून भाजपा उमेदवार 14 हजार मतांनी पुढे
पाचव्या फेरी अखेर धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे 14200 मतांनी आघाडीवर आहेत.
4 Jun 2024, 11:14 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: मावळ लोकसभा मतदारसंघातील चौथ्या फेरीनंतरची मतं खालीलप्रमाणे:
चौथी फेरीनंतर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे 20,686 मतांनी आघाडीवर आहेत.
श्रीरंग बारणे (महायुती) - 123711
संजोग वाघेरे (महाविकास आघाडी) - 103025
4 Jun 2024, 11:12 वाजता
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Live Updates: तिसऱ्या फेरीनंतर संदीपन भूमरे आघाडीवर
संभाजीनगरमध्ये तिसऱ्या फेरीनंतर संदीपन भूमरे 228 मतांनी आघाडीवर आहेत.
संदिपान भुमरे (शिवसेना) - 50946
इम्तियाज जलील (MIM) - 50718
चंद्रकांत खैरे (शिवसेना UBT) - 35506
4 Jun 2024, 11:00 वाजता
देशभरातील निकाल कुणाच्या बाजुनं?
देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.