close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

lok sabha election 2019 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा दारुण पराभव

राजू शेट्टींसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Updated: May 30, 2019, 06:13 PM IST
lok sabha election 2019 : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचा दारुण पराभव

हातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि उमेदवार राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघातून पराभव झाला आहे. हातकणंगलेतील मतदारांनी शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या बाजूने कौल दिला आहे. देशपातळीवर शेतकरी नेता म्हणून ओळख असलेल्या राजू शेट्टी यांचा विजय निश्चित मानला जात होता, मात्र हातकणंगलेच्या मतदारांनी त्यांना नाकारले. या मतदारसंघात शेतक-यांसोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला होता, त्यामुळे आपल्या विजयाची त्यांना खात्री होती. शिवसेनेने धैर्यशिल माने यांना निवडणूकीच्या मैदानात उतरवून आपले डावपेच खरे ठरवले. वंचित आघाडीने अस्लम सय्यद यांना उमेदवारी दिली होती. 

हातकणंगले मतदारसंघात 12 लाख 52 हजार 211 जणांनी मतदान केले. यामध्ये स्वाभिमानी पक्षाच्या राजू शेट्टी यांना 4 लाख 87 हजार 276 मतं मिळाली तर शिवसेनेच्या धैर्यशिल माने यांना 5 लाख 82 776 मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या अस्लम सय्यद यांना 1 लाख 23 हजार 151 मतं मिळाली.

लाईव्ह अपडेट

11:54 AM-  शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने पुन्हा आघाडीवर 17 हजार मतांची माने यांना आघाडी. राजू शेट्टी पुन्हा पिछाडीवर

9:34 AM- पहिल्या फेरीअखेर शिवसेनेचे धैर्यशील माने आघाडीवर माने यांना 35058 मते तर खासदार राजू  शेट्टी यांना 35004 मते

9.08am- खासदार राजू शेट्टी 54 मतांनी पिछाडीवर

 

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

 पक्ष

 मतदान

राजू शेट्टी स्वा. शे. संघटना 640428
कल्लापा आवाडे काँग्रेस 462618
सुरेश पाटील अपक्ष 25648
चंद्रकांत कांबळे बसपा 11499
नोटा नोटा 10059

२०१४ साली राजू शेट्टी यांना ६ लाख ४० हजार मतं मिळाली होती. कल्लाप्पा आवाडे यांचा १ लाख ७७ हजार मतांनी पराभव झाला होता.

मुंबई

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर-मध्य

मुंबई दक्षिण-मध्य

दक्षिण मुंबई

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रायगड

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

विदर्भ 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमूर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशीम

बुलडाणा

अकोला

अमरावती

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सोलापूर

बारामती

सातारा 

सांगली

कोल्हापूर

हातकणंगले

मावळ

अहमदनगर

माढा

शिरुर

मराठवाडा

औरंगाबाद

जालना

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

शिर्डी

रावेर

जळगाव