close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Election results 2019: नागपूरमधून नितीन गडकरींचा विजय

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपूरच्या लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं

Updated: May 23, 2019, 09:07 PM IST
Election results 2019: नागपूरमधून नितीन गडकरींचा विजय

नागपूर : नागपूरमध्ये नितीन गडकरींनी काँग्रेसच्या नाना पटोलेंचा पराभव केला आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये नाना पटोले आघाडीवर होते, त्यामुळे नागपुरात मोठा उलटफेर होतोय का काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण गडकरींनी २ लाखांपेक्षा जास्तची आघाडी घेतल्यानंतर गडकरींचा विजय निश्चित झाला.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र युतीला विदर्भातल्या दोन जागा गमवाव्या लागल्या. 

अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा पराभव केला आहे. शिवसेना-भाजप युतीने विदर्भातली गमावलेली ही दुसरी जागा आहे. याआधी चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी भाजपच्या हंसराज अहिर यांचा पराभव केला.

हंसराज अहिर हे केंद्रामध्ये राज्य मंत्री होते. याआधी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा रायगडमधून राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे यांनी पराभव केला.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपूरच्या लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं. भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसने नाना पटोलेंना मैदानात उतरवलं. नाना पटोले यांनीही गडकरींना कडवं आव्हान दिलं.

२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियामधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढली होती. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता. आता या निवडणुकीत पुन्हा एकदा असाच करिश्मा होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघातले निकाल

मुंबई

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर-मध्य

मुंबई दक्षिण-मध्य

दक्षिण मुंबई

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रायगड

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

विदर्भ 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमूर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशीम

बुलडाणा

अकोला

अमरावती

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सोलापूर

बारामती

सातारा 

सांगली

कोल्हापूर

हातकणंगले

मावळ

अहमदनगर

माढा

शिरुर

मराठवाडा

औरंगाबाद

जालना

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

शिर्डी

रावेर

जळगाव

२०१४ निवडणुकीचे निकाल

२०१४ साली नागपूरमधून नितीन गडकरी यांनी काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांचा २,८४,८२८ मतांनी पराभव केला होता.

२०१४ निवडणुकीची आकडेवारी

उमेदवार

पक्ष

मिळालेली मतं

नितीन गडकरी भाजप ५,८७,७६७
विलास मुत्तेमवार काँग्रेस ३,०२,९१९
मोहन गायकवाड बसपा ९६,४३३
अंजली दमानिया आप ६९,०८१
नोटा   ३,४६०