Raj Thackeray on Sharad Pawar: मणिपूरसारखं (Manipur Violence) काहीतरी महाराष्ट्रातही घडेल की काय अशी चिंता वाटते असं विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान त्यांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी हातभार लावू नये असा टोला त्यांनी लागवला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो असं विधान शरद पवारांनी केलं असल्याचं सांगत राज ठाकरेंना त्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर त्यांनी शरद पवारांनी यासाठी हातभार लावू नये इतकी आशा आहे असा टोला लगावला. महाराष्ट्रता जे चालू आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. फक्त मतांसाठी मन कलुषित करणं जे सुरु आहे ते चांगलं लक्षण नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
'उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण...,' राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, 'दिवे लावण्याचे उद्योग...'
"मणिपूरसारखं काहीतरी महाराष्ट्रातही घडेल की काय अशी चिंता वाटते," असं शरद पवारांनी म्हटलं आहे. "मणिपूरमध्ये जे घडलं तेच आजुबाजूच्या राज्यात घडलं. कर्नाटकात घडले. संसदेत मणिपूरमधील हिंसाचाराची चर्चा झाली. मणिपूरमध्ये पिढ्यान-पिढ्या एकत्र असलेला लहानसा प्रांत अस्वस्थ झालाय," असं शरद पवारांनी म्हटलं. "मणिपूरमध्ये सुसंवाद ठेवणारा समाज आज एकमेकांशी बोलायला तयार नाही. मणिपूरवर एवढं मोठं संकट आल्यानंतरही तिथल्या जनतेला दिलासा द्यावा असं मोदींना वाटलं नाही. मोदींनी मणिपूरकडे ढुंकूनही पाहिलं नाही," अशी टीका पवारांनी केलीय.
महाराष्ट्रात सध्या जाती-पातीवरुन सुरु असलेलं राजकारण, संघर्ष याबद्दल विचारण्यात आलं असता राज ठाकरे म्हणाले की, "फक्त मतांसाठी मन कलुषित करणं जे सुरु आहे ते चांगलं लक्षण नाही. मी लहान मुलींचे व्हिडीओ पाहिले, ते अत्यंत दुर्दैवी आहेत. राजकारण्यांनी यावर विचार केला पाहिजे. जाती-पातीत विष कालवून मत मिळणार असेल तर महाराष्ट्राचं भविष्य चांगलं नाही".
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या ऑनर किलिंगबद्दल विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, "खालपासून वरपर्यंत आपण सहज सुटू शकतो असं काही लोकांना वाटू लागतं तेव्हा भिती नावाची गोष्ट उरत नाही. मुंबईत अशी अनेक प्रकऱणं झाली जिथे ट्राफिक पोलिसांना टपली मारुन गेले. त्यांच्यावर काराई होणार नसेल तर भिती राहत नाही. परदेशात पोलिसाला हात लावून दाखा आणि नंतर त्याला सोडवून दाखवा. अशा अनके घटना पोलिसांबाबत घडू शकतात. जर पोलिसांवर हात उचलण्यापपर्यंत मजल जात असेल आणि काही करु शकत नाही असं वाटत असेल तर कोणत्या कायदा सुव्यवस्थेवर बोलणार आहोत".