मुंबई : Nanar Oil Refining Project in Barsu :कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत महत्वाची बातमी. नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प हा जाणार नाही तर दुसऱ्या ठिकाणी होणार आहे. तसे संकेत मिळत आहेत. आता नाणार ऐवजी बारसू गावचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी (refinery project) बारसू येथे 13 हजार एकर जागा देण्याची तयारी राज्य सरकारची आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. स्थानिक जनतेच्या विरोधानंतर शिवसेनेने राजापूर येथील नाणार प्रकल्पाला विरोध केला. या विरोधामुळे बारगळलेला नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प हा आता रत्नागिरीतच होणार आहे.
हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच बारसू गाव परिसरात होण्याची शक्यता आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना जानेवारी महिन्यात पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पत्रातून प्रकल्पासाठी 13 हजार एकर जागा देण्याची तयारीही दाखवली आहे. त्यामुळे नाणार आता बारसू येथे होण्याची शक्यता आहे.