Jitendra Awhad Interview: CM शिंदे आणि तुमची मैत्री का संपली? आव्हाडांनी केला खुलासा, म्हणाले "मला अटक झाली तेव्हा..."

Jitendra Awhad Black and White Interview: ठाण्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) या दोन नावांना वेगळं महत्त्व आहे. एकमेकांचे मित्र असणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये सत्तांतर झाल्यापासून मात्र शत्रुत्व निर्माण झालं आहे. यामागे नेमकं काय कारण आहे याचा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमात केला आहे.   

Updated: Feb 7, 2023, 04:16 PM IST
Jitendra Awhad Interview: CM शिंदे आणि तुमची मैत्री का संपली? आव्हाडांनी केला खुलासा, म्हणाले "मला अटक झाली तेव्हा..."

Jitendra Awhad Black and White Interview: मी एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) मैत्री होती हे नाकारत नाही. पण माझ्यावर 354 लावण्यात आलं आणि त्यावर त्यांनी माझा काही संबंध नाही म्हटलं तेव्हा मला कुठेतरी पाणी मुरतंय हे कळून चुकलं होतं. तेव्हा मला आपण अलर्ट व्हायला हवं असं वाटलं असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी केला आहे. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंसह संबंध का बिघडले याचा खुलासा केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचे संबंध का बिघडले असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले "ते मलाही समजलं नाही. मी त्यांना विचारण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी जे उत्तर मला दिलं होतं ते महाराष्ट्रालाही कळलं पाहिजे. माझ्यासोबत असं का केलं विचारलं असता ते म्हणतात, अरे जितेंद्र मी कुठे केलं. तुला माहिती आहे ना ते कोण करतं".

Jitendra Awhad Interview: तुम्हाला 'बोक्या' का म्हणतात? जितेंद्र आव्हाडांनी दिलं उत्तर, म्हणाले "माझे डोळे...."
पुढे ते म्हणाले "मला इतकंच माहिती आहे की, मुख्यमंत्र्यांना सांगितल्याशिवाय माझ्यावरील अटकेची कारवाई झालेली नसणार. कोणत्याही आयुक्तांमध्ये मुख्यमंत्र्यांना सांगितल्याशिवाय कारवाई करण्याची हिंमत नाही. शिंदे गटात प्रवेश कऱण्यासाठीही लोकांना धमकावलं जात आहे. अन्यथा खोटा मोक्का लावण्याची धमकी दिली जात आहे".

"जेव्हा तुम्ही औरंगजेबाला छोटं करता...", शिवरायांसंबंधी 'त्या' विधानावर आव्हाडांनी पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण
मुख्यमंत्र्यांचं भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आणल्याने शत्रुत्व वाढलं का? असं विचारलं असता ते म्हणाले की "मला संपवण्याचा विचार असेल तर मला जिवंत राहायचं आहे. मीदेखील राजकारणात 35 वर्ष घालवली आहेत. मीदेखील तितक्याच गरिबातून, मेहनतीने वर आलो आहे. मातोश्रीने किमान शिंदेंना सगळं ठाणे आंदण म्हणून दिलं होतं. तसं आमच्या आयुष्यात कधी घडलं नाही". दरम्यान पक्षाने मला कधीचं एकटं पाडलं नाही असं सांगत आव्हाडांनी दावे फेटाळून लावले. 

तुम्हाला बोक्या का म्हणतात? 

तुम्हाला बोक्या का म्हणतात? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले "आमच्याकडे सध्या खोके खूप फॉर्मात आहेत. आमच्यातील काही नगरसेवक त्या खोक्यांना बळी पडले आहेत. आमच्या इथे पोखरकर नावाचा एक ब्लॉग रायटर आहे त्याने हे खोका-बोका पोस्टर लावलं आहे. खोका घेणाऱ्या बोक्यांना जनता माफ करणार नाही असं ते विडंबन आहे. त्यावरुन मग मला आता कदाचित माझ्या घाऱ्या डोळ्यांवरुन बोक्या म्हणत असतील," दरम्यान जितुद्दीन म्हणो किंवा आव्हाडुद्दीन म्हणो, मला फरक पडत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

किती नगरसेवक फुटतील असं विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं की, "जास्त फुटणार नाहीत, पण काही गद्दार लगेच जातात. माझ्या आयुष्यात मी एक चूक केली. ज्यांच्या रक्तातच गद्दारी आहे अशा मुंब्र्यातील कुटुंबाला माफ करुन जवळ घेतलं आणि त्यांनी पुन्हा गद्दारी केली". माझ्या जवळचा एकही नगरसेवक जाणार नाही असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.