सावधान, या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट

कोरोनाचा धोका कायम आहे. (Coronavirus in Nashik) नाशिक शहरात लहान मुलांना बाजारपेठांमध्ये शॉपिंग करण्यासाठी धोकादायक अवस्थेमध्ये फिरवले जाते covid-19 से निर्बंध पाळले जात नसल्याचे 'झी24तास' नाही केलेल्या पाहणे समोर येत आहे . .

Updated: Jun 24, 2021, 10:05 PM IST
सावधान, या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट

योगेश खरे / नाशिक : कोरोनाचा धोका कायम आहे. (Coronavirus in Nashik) नाशिक शहरात लहान मुलांना बाजारपेठांमध्ये शॉपिंग करण्यासाठी धोकादायक अवस्थेमध्ये फिरवले जाते covid-19 से निर्बंध पाळले जात नसल्याचे 'झी24तास' नाही केलेल्या पाहणे समोर येत आहे . अगदी वर्षभराच्या मुलापासून ते आठ वर्षांपर्यंत ची मुलं आणि त्यांचे पालक मास्क न लावताना फिरताना दिसत आहे . दुसऱ्याला टीममध्ये सर्वाधिक धोका हा लहान मुलांना संभवतो असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे, असं असताना पालक मात्र बेफिकीर होत याकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल न केल्याने कोरोना बाधित रुग्ण संख्या आटोक्यात होती. मात्र  गेल्या चोवीस तासात बुधवारी अचानक रुग्ण संख्या दुप्पट झाली आहे. तर पॉझीटीव्हीटी रेट सुद्धा दुपटीने वाढला आहे. त्यामुळे शहरातील मॉल बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणांवर पुन्हा एकदा प्रशासकीय अंकुश लावण्याची मागणी केली जात आहे.

गेल्या  मंगळवारी नाशिक जिल्ह्यात कोरूना रुग्ण संख्या १८3 होती ती अचानक बुधवारी ३३८ झालीय तर चार रुग्ण दगावले आहेत. गेल्या आठ दिवसात १२३३ रुग्णाची वाढ झालीय. बुधवार रोजी पोर्टलवर ६९ रुग्ण दगावल्याची नोद झाली असून प्रत्यक्षात दिवसभरात ४ रुग्ण दगावले आहेत.  

   नाशिक  जिल्ह्यात आठवड्याभरापासून नवीन रुग्ण संखेतील वाढ सातत्याने १०० ते २०० मध्ये कायम होती मात्र बुधवारी अचानकपणे त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. नवीन ३३८ रुंग्नामध्ये २३६ नाशिक ग्रामीण, ९६ नाशिक महानगरपालिका, २ रुग्ण मालेगाव आणि ४ रुग्ण जिल्हाबाह्य आहेत. तर पोर्टलवर बुधवारी नोंद करण्यात आलेल्या ६९ मृत्यूमध्ये ३९ रुग्ण नाशिक महानगर पालिकेचे तर ३० रुग्ण नाशिक ग्रामीणचे आहेत.

जिल्ह्याचा आठवड्याभराचा पॉझीटीव्हीटी रेट हा साधारणपणे १.५० टक्केच्या आसपास  होता. मात्र बुधवारी झालेल्या रुग्ण वाढीमुळे हा पॉझीटीव्हीटी रेट 3.०४ टक्के झालाय. तिसर्या लाटेत रुग्ण संख्या दोन ते तीन  पटीने असेल आणि त्याच प्रमाणात ऑक्सिजन सुद्धा लागणार असल्याचे भाकीत टास्क फोर्सने वर्तविले असताना नाशिक जिल्ह्याचा वाढलेली रुग्ण संख्या आणि वाढलेला  पॉझीटीव्हीटी रेट चिंताजन असू शकतो.