पहा तुमचे देवघर कुठे असावे...

घरात देवघर असणे आवश्यक आहे. पण ते योग्य स्थानी असेल तरच मनालाही शांती मिळते. देवाची पूजा आपण करतो पण देवघर कुठे असावे याची माहिती आपल्याला नसते.

Updated: May 7, 2013, 09:32 AM IST

www.24taas.com
घरात देवघर असणे आवश्यक आहे. पण ते योग्य स्थानी असेल तरच मनालाही शांती मिळते. देवाची पूजा आपण करतो पण देवघर कुठे असावे याची माहिती आपल्याला नसते. त्यामुळे हवे असलेले फळ आपल्याला मिळत नाही. मोठ्या शहरांमध्ये जागा कमी असते. त्यामुळे वेगळे देवघर शक्य नसते. पण आजही बर्याहच घरांमध्ये वेगळे मंदिर किंवा घरात वेगळी खोलीही तयार केलेली असते.
घरातील देवघर एक शक्तीशाली ऊर्जेचा स्त्रोत असतो. त्यामुळे हा स्त्रोत घरात जागोजागी पसरलेला नको. सांगण्याचे तात्पर्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये दोन किंवा तीन देवघरे नको. एकाच कुटूंबातील काहीजण आपापल्या बेडरूमजवळ वेगवेगळे देवघर बनवितात. पण वास्तूशास्त्राच्या दृष्टीने हे अयोग्य आहे.
संयुक्त कुटूंबात तर एकाच जागी देवघर असणे अत्यावश्यक असते. मग कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या सोयीनुसार एकत्र किंवा वेगवेगळी पूजा करू शकतात. नवीन घर बांधत असाल तर उत्तर-पूर्वेला म्हणजे ईशान्य कोपऱ्यात देवघर करणे सवोत्तम आहे. मूर्तींचे मुख पश्चिमेकडे करणे उत्तम असते. ईशान्य कोपरा देवतांचे गुरू बृहस्पती आणि मोक्षकारक केतुची दिशा मानली जाते.