मराठमोळं अष्टपैलू व्यक्तिमत्व हरवलं, सदाशिव अमरापूरकर यांचं निधन

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारं मराठमोळं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे सदाशिव अमरापूरकर यांचं दु:खद निधन झालंय. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते.

Updated: Nov 3, 2014, 08:01 AM IST
मराठमोळं अष्टपैलू व्यक्तिमत्व हरवलं, सदाशिव अमरापूरकर यांचं निधन title=

मुंबई: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारं मराठमोळं अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे सदाशिव अमरापूरकर यांचं दु:खद निधन झालंय. कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६४ वर्षांचे होते.

दोन आठवड्यांपासून ते फुप्फुसाच्या जंतूसंसर्गामुळे आजारी होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आणि प्रत्येक भूमिका अक्षरश: जीवंत केली. 

त्यांच्या मागे पत्नी सुनंदा अमरापूरकर, तीन मुली केतकी जहागिरदार, सायली जातेगावकर आणि रिमा गद्रे आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.