Maharashtra Assembly Elections 2014

सीमाभागात आज काळा दिवस, निपाणी बंदची हाक

सीमाभागात आज काळा दिवस, निपाणी बंदची हाक

राज्य पुनर्रचनेच्यावेळी बेळगांवसह सीमाभागातील ८६५ खेडी अन्यायानं १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्यात डांबण्यात आली. या अन्यायाच्या निषेधार्थ संपूर्ण सीमाभागात आज काळा दिवस पाळला जातो. 

Nov 1, 2014, 11:30 AM IST
शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह हवीत १० मंत्रिपदं, सूत्रांची माहिती

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह हवीत १० मंत्रिपदं, सूत्रांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप-सेनेची पुन्हा युती होण्याचे संकेत दिले आहेत. आता शिवसेना-भाजपमध्ये मंत्रिपदाच्या वाटाघाटीची चर्चा सुरू आहे. 

Nov 1, 2014, 11:07 AM IST
राज्य सेवा हमी योजना लागू करणार, पहिला निर्णय

राज्य सेवा हमी योजना लागू करणार, पहिला निर्णय

भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Oct 31, 2014, 02:50 PM IST
फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची प्रोफाईल

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची प्रोफाईल

भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. उद्योगपती, सिनेस्टार आणि खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रीपद शपथविधीचा दिमाखदार सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे देवेंद्र यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची  प्रोफाईल पाहा.

Oct 31, 2014, 01:35 PM IST
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी ?

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी ?

देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्री आज शपथ घेणार आहेत.  

Oct 31, 2014, 11:49 AM IST
देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे यांच्या भेटीची शक्यता

देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरे यांच्या भेटीची शक्यता

भाजचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट होण्याची शक्यता आहे.

Oct 31, 2014, 10:37 AM IST
वानखेडेवर पोलीस फौजफाटा, CM शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन

वानखेडेवर पोलीस फौजफाटा, CM शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन

महामुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर होणा-या सोहळ्याची विशेष तयारी पाहायला मिळतेय. वानखेडेवर या सोहळ्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर कडक सुरक्षेसाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

Oct 31, 2014, 10:22 AM IST
मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला शिवसेनेची अनुपस्थिती

मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला शिवसेनेची अनुपस्थिती

राज्यातील भाजपच्या पहिल्या वहिल्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. भाजपकडून शिवसेनेला मानसन्मान मिळत नसल्याने तेथे जायचेच कशाला, असा संताप शिवसेनेच्या आमदारांमध्ये असल्याचे शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. आजच्या सोहळ्यात शिवसेनेचे आमदार, खासदार कुणीच उपस्थित राहणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.

Oct 31, 2014, 07:55 AM IST
युतीचा निर्णय आता शपथविधी दिनीच होणार

युतीचा निर्णय आता शपथविधी दिनीच होणार

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची उद्या भेट होण्याची शक्यताय. शिवसेनेला बरोबर घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान दिल्लीतील भाजप नेत्यांची बैठक संपलीय. मोदी, अमित शाह आणि फडणवीस यांच्यात तीन तास चर्चा सुरू होती.

Oct 30, 2014, 10:16 PM IST
एमआयएमच्या मनात आहे तरी काय?

एमआयएमच्या मनात आहे तरी काय?

विधानसभा निवडणुकीत औरंगाबादेत यश मिळाल्यानंतर आता एमआयएम औरंगाबादेत चांगल्याच मजबूत स्थितीत येत असल्याचं चित्र आहे. एमआयएमच्या यशानं काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची चिन्हं आहे.  

Oct 30, 2014, 08:57 PM IST
रेल्वे, विमानाला मागे टाकत मित्रांचा ताफा कारनं निघाला!

रेल्वे, विमानाला मागे टाकत मित्रांचा ताफा कारनं निघाला!

राज्यातील भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी वानखेडे स्टेडियमवर भव्य स्टेज उभारण्यात येतोय. महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि वैभवाची झलक या स्टेजवर पहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्यावर स्टेज करण्याची जबाबदारी देण्यात आलीय.   

Oct 30, 2014, 06:52 PM IST
दारूण पराभवानंतर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

दारूण पराभवानंतर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

विधानसभेतील दारूण पराभवानंतर, मनसेचे कार्यकर्ते १ नोव्हेंबर रोजी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेणार होते, मात्र १ नोव्हेंबर रोजी राज ठाकरे हे  अहमदनगर जिल्ह्यातील दलित कुटुंब हत्येप्रकरणी पाथर्डीतील जवखेडा गावी असणार आहेत. 

Oct 30, 2014, 04:45 PM IST
शिवसेना विरोधात बसणार, शपथविधीला उद्धव जाणार नाहीत

शिवसेना विरोधात बसणार, शपथविधीला उद्धव जाणार नाहीत

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या उद्या होणाऱ्या शपथविधीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. शिवसेनेनं विरोधी पक्षात बसण्याची तयारी सुरू केल्याचं समजतंय. 

Oct 30, 2014, 04:43 PM IST
हा पाहा, 'रामटेक'ला चिकटलेल्या भुजबळांचा नवीन राजमहाल!

हा पाहा, 'रामटेक'ला चिकटलेल्या भुजबळांचा नवीन राजमहाल!

‘रामटेक’नंतर जायचं कुठं? असा प्रश्न माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना कदापि पडणार नाही... कारण, तशी तजबीजचं त्यांनी अगोदरपासून करून ठेवलीय. गेल्या १५ वर्षांपासून रामटेकमध्ये आसरा घेतलेल्या भुजबळांनी ‘ला पेटीट फ्लुअर’मध्ये आपलं बस्तान हलवलंय.

Oct 30, 2014, 12:48 PM IST
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचं ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग'

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचं ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग'

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाच्या अग्रलेखात राष्ट्रवादीचा पाठिंबा न घेण्याबाबत इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

Oct 30, 2014, 12:05 PM IST
शाह-गडकरींचा मुंबई दौरा रद्द, फडणवीस दिल्लीला!

शाह-गडकरींचा मुंबई दौरा रद्द, फडणवीस दिल्लीला!

राज्याचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीसाठी रवाना झालेत. त्यांनी सकाळीच ओम माथूर यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीकडे निघाले. 

Oct 30, 2014, 10:31 AM IST
देवेंद्र फडणवीस यांची पहिली परीक्षा ६ नोव्हेंबरला!

देवेंद्र फडणवीस यांची पहिली परीक्षा ६ नोव्हेंबरला!

भाजपनं सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाताना, देवेंद्र फडणवीस सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे. ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान विधीमंडळाचं अधिवेशन होणार असून ६ नोव्हेंबररोजी भाजपाला विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. 

Oct 29, 2014, 10:06 PM IST
दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय

दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय

विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय झालेत. राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय. निवडणुकीनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या राज ठाकरेंनी थेट शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घातलाय. 

Oct 29, 2014, 09:49 PM IST
गुरूवारी लागणार भाजप-शिवसेनेच्या युतीचा निकाल?

गुरूवारी लागणार भाजप-शिवसेनेच्या युतीचा निकाल?

युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून भाजप आणि शिवसेनेत ‘पहले आप पहले आप’ सुरू झालंय. सत्तेमध्ये सहभागी होण्यास शिवसेना तयार आहे. मात्र भाजपकडून सन्मानजनक प्रस्तावाची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी दिलीय. 

Oct 29, 2014, 09:07 PM IST
पाहा: देवेंद्र फडणवीसांच्या शवथविधी समारंभाची गेस्ट लिस्ट

पाहा: देवेंद्र फडणवीसांच्या शवथविधी समारंभाची गेस्ट लिस्ट

३१ तारखेच्या शपथविधी सोहळ्याला मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: फोन करून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवारांना आमंत्रण दिल्याची माहिती मिळतेय.

Oct 29, 2014, 08:38 PM IST