ठाणे : पाकिस्ताननं आपला नेहमीच घात केलाय. निवडणुकीच्या आधी मोदी जी भाषा वापरत असत तसेच सडेतोड उत्तर मोदी पाकिस्तानला देतील अशी आशा असल्याचं शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना म्हटलय.
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानी पत्रकारांना सुरक्षा दिली जाते मग मंत्र्यांना का नको असा सवालही उपस्थित केला. याखेरीज दिल्लीतल्या सम विषम फॉर्मुल्याचं स्वागतही त्यांनी केलं. आपल्याकडेही कुठल्या फॉर्मुल्याची आवश्यकता आहे यावर मतं मागवावित असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकारदिनी ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. शिवसेना पक्षप्रमुख, दैनिक ‘सामना’चे संपादक उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रणदिवे आणि अन्य ज्येष्ठ पत्रकारांना पुरस्कार दिले गेले.
९१ वर्षांत पदार्पण करणारे रणदिवे यांना यावेळी ९१ हजारांची थैली, मानपत्र आणि स्मृतिचिन्हं प्रदान करण्यात आलं...
ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये हा राज्यस्तरीय पत्रकार दिन सोहळा पार पडला... ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे, ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.