मुंबईत भरधाव कारने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडले

पुऩ्हा एकदा भरधाव गाडीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले. सोमवारी रात्री मंत्रालयाच्या परिसरात भरधाव मर्सिडीज गाडीखाली कॉन्स्टेबल नितीन चव्हाण आणि रामचंद्र लोखंडेंना चिरडले. 

Updated: Dec 21, 2016, 07:37 AM IST
मुंबईत भरधाव कारने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चिरडले title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : पुऩ्हा एकदा भरधाव गाडीने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवले. सोमवारी रात्री मंत्रालयाच्या परिसरात भरधाव मर्सिडीज गाडीखाली कॉन्स्टेबल नितीन चव्हाण आणि रामचंद्र लोखंडेंना चिरडले. 

दोघांना जखमी अवस्थेत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.  गाडी पेडररोडवर राहणारे उद्योजक करण गुप्ता असून गाडी त्यांचा ड्रायवर विशाल नाईक चालवत होता. रात्री सव्वा अकराच्या सुमारास चव्हाण आणि लोखंडे आपल्या मोटरसायकलवरून मंत्रायलाच्या रस्त्यावरून ड्यूटी संपवून घरी निघाले होते. 

यावेळी मर्सिडीजनं त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती लोखंडेच्या हेलमेट डोक्यातून निघून उंच उडालं आणि त्याचे दोन तुकडे झाले.