मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमदार जितेंद्र आव्हाड यांना चांगलाच हिसका दिलाय. येत्या महानगरपालिका तसेच इतर निवडणुकीची जबाबदारी पक्षाने अनेक वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांकडे सोपवलीये. मात्र यात जितेंद्र आव्हाड यांना स्थान देण्यात आलेले नाहीये.
अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, गणेश नाईक, धनंजय मुंडे, जयदत्त क्षीरसागर, भास्कर जाधव या नेत्यांकडे पक्षाने निवडणुकींची जबाबदारी सोपवलीये. मात्र यात आव्हाडांचा समावेश नाहीये.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जबाबदारी वाटपात आव्हाड यांना फारसे महत्त्व दिले नसल्याचीही चर्चा पक्षात रंगतेय.