टी-२० सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अम्पायर

न्यूझीलंडच्या कॅथलिन क्रॉस आणि ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक या दोन वुमेन्स अम्पायर जेव्हा टी-२० वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये मैदानावर उतरतील त्यावेळी इतिहासाची नोंद होईल... टी-२० वर्ल्ड कपसारख्या मेगा इव्हेंटमध्ये अम्पायरिंग करणा-या या पहिल्या वुमेन्स अम्पायर ठरणार आहेत. 

Updated: Mar 9, 2016, 10:00 PM IST
टी-२० सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अम्पायर title=

नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या कॅथलिन क्रॉस आणि ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक या दोन वुमेन्स अम्पायर जेव्हा टी-२० वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये मैदानावर उतरतील त्यावेळी इतिहासाची नोंद होईल... टी-२० वर्ल्ड कपसारख्या मेगा इव्हेंटमध्ये अम्पायरिंग करणा-या या पहिल्या वुमेन्स अम्पायर ठरणार आहेत. 

अवघ्या क्रिकेटजगताचं लक्ष हे मेन्स टी-२० वर्ल्ड कपकडे आहे. मात्र, वुमेन्स टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत जे घडलं नाही ते घडणार आहे... दोन वुमेन्स अम्पायर या टी-२० वर्ल्ड कपमध्ये अम्पायरिंग करणार आहेत. न्यूझीलंडच्या कॅथलीन क्रॉस आणि ऑस्ट्रेलियन अम्पायर क्लेरी पोलोसाक या अम्पायर्स हा कारनामा करणार आहेत. आयसीसी मॅच रेफ्रीज आणि एलिट पॅनेल ऑफ आयसीसी अम्पायर्स त्याचप्रमाणे आयसीसी असोसिएट्स आणि अॅफिलेट पॅनलनी या दोन गुणी अम्पायर्सची निवड केली आहे.

कॅथलिन क्रॉस या १६ मार्चाला पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश मॅचमध्ये अम्पायरिंग करत इतिहासाची नोंद करतील. दोन दिवसानंतरच म्हणजेच १८ मार्चला मोहालीत न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड मुकाबल्यात अम्पायरिंग करतील. कॅथलिन क्रॉस यांना अम्पायरिंगचा अधिक अनुभव आहे. २०१४ आयसीसीच्या अॅफिलेट पॅनलमध्ये स्थान मिळवणाऱ्या त्या पहिल्या वुमेन्स अम्पायर ठरल्या होत्या. २०००, २००९ आणि २०१३ वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये त्यांनी याआधी अम्पायरिंग केलं होतं. मेन्स सिनियर इव्हेंटमध्येही आपल्या अम्पायरिंगनं त्यांनी सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं होतं. तर ऑस्ट्रेलियाच्या पोलोसाक यांनी २०१५ मध्ये वर्ल्ड टी-२० क्लासिफायरमध्ये आयसीची यंगेस्ट ऑफिशियल होण्याचा मान पटकावला होता. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मॅटेडार वन-डे कपमध्ये त्या पहिल्या फिमेल ऑफिशिएट झाल्या होत्या.

क्रिकेटच्या मैदानावर दोन वुमेन्स अम्पायर्स आपल्या अम्पायरिंगची जादू दाखवण्यास सज्ज आहेत. आयसीसीनं हे पाऊल इतरही वुमेन्स अम्पायर्सनी या क्षेत्राकडे वळवण्यासाठीच उचललंय. त्यामुळे कॅथलिन आणि पोलोसाक यांच्यापासून प्रेरणा घेत क्रिकेटच्या मैदानात मेन्स वर्ल्ड कपमध्ये वुमेन्स अम्पायर्स भविष्यात पाहायला मिळतील, अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही.