जाधव-तटकरे यांची कानउघडणी, पवारांचा समझोता यशस्वी

गेले अनेक महिने राष्ट्रवादीचे नेत भास्कर जाधव आणि जलसंपदा मंत्री सुनील टकरे यांच्यातील शितयुद्ध टोकाला गेल्याने जाहीर थेट आरोप-प्रत्यारोप झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्य़ावर आला. उमुख्यमंत्री अजित पवार यांनी भास्कर जाधव यांनी समजावले होते. मात्र, वाद काही मिटेना. त्यामुळे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांना मध्यस्ती करावी लागली. त्यांनी दोघांची चांगलीच कानउघडनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 3, 2013, 08:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेले अनेक महिने राष्ट्रवादीचे नेत भास्कर जाधव आणि जलसंपदा मंत्री सुनील टकरे यांच्यातील शितयुद्ध टोकाला गेल्याने जाहीर थेट आरोप-प्रत्यारोप झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्य़ावर आला. उमुख्यमंत्री अजित पवार यांनी भास्कर जाधव यांनी समजावले होते. मात्र, वाद काही मिटेना. त्यामुळे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांना मध्यस्ती करावी लागली. त्यांनी दोघांची चांगलीच कानउघडनी केल्याचे सांगण्यात येत आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्हे असा वाद रंगला. तर रत्नागिरीत भास्कर जाधव एकटे पडल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीतील मंत्री, माजी आमदार आणि काही पदाधिकारी जाधवांच्या विरोधात असल्याचे चित्र आहे. ही नाराजी जाधव यांनी ओढवून घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भास्कर जाधव विरूद्ध जिल्हा राष्ट्रवादी असा गट दिसतो.
आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राष्ट्रवादीतील धुसफूस मारक असल्याने शरद पवारांना लक्ष घालावे लागले. त्यांनी वरिष्ठ नेत्यांची विशेष आणि तात्काळ बैठक बोलावली. या बैठकीत सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यातील वादावर पडदा पडला. शरद पवारांनी दोन्ही नेत्यांना समज दिली. तसेच पक्षाच्या हितासाठी गुण्यागोविंदाने नांदण्याचा सल्लाही पवारांनी दिला. मात्र, पवार यांच्या कानउघडणीनंतर दोघांमध्ये समझोता झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या बैठकीनंतर जाधव आणि तटकरे यांनी आपापले मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आल्याची घोषणा करत या वादावर पडदा पडल्याचे सूचित केले. कोकणातील साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद सुनील तटकरेंना देण्यात आल्यावर वादाला सुरूवात झाली होती. यामुळे संतप्त झालेल्या भास्कर जाधव यांनी आपण पालकमंत्री असताना तटकरेंना स्वागताध्यक्ष कसे केले, असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर जाधव यांनी तटकरेंवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. संगमेश्वर येथील गडनदी प्रकल्प कामाची जाहिरात वृत्तपत्रात झळकल्यावर त्यात भास्कर जाधव यांचा नाव वा फोटो नव्हता. यामुळे भडकलेल्या जाधव यांनी जाहीर सभेत वृत्तपत्राचे कात्रण दाखवत माझ्याकडे अधिकृत पुरावा असल्याचे म्हटले होते. आता मी घाबरत नाही, असे ठणकावून सांगितले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ