मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या T20 सामन्यात एक मोठा विक्रम केला आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने टीमला वेगवान सुरुवात करून दिली आणि छोटीखेळी खेळून बाद झाला. मात्र या खेळीदरम्यान त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
टेस्ट सामन्यापूर्वी टीमचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तो टीम बाहेर होता. मात्र टी-20 मालिकेत त्याने पहिल्याच सामन्यात कमबॅक करताना मोठा विक्रम केलाय. त्याने टीम इंडियाला मागे टाकत एक विक्रम केला आहे.
या सामन्यात रोहित शर्माने 14 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 24 रन्स केले. या खेळीच्या मदतीने रोहित टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने यामध्ये माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलंय. कोहलीने 30 डावात हा पराक्रम केला, मात्र रोहित शर्माने 29 डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे.
रोहित शर्मा हा टीम इंडियाचा टी-20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर 3313 धावा आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 4 शतकं आणि 26 अर्धशतकं झळकावली आहेत.