हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा पत्नी नताशाला फटका; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Natasa Stankovic: हार्दिक पांड्याला गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागतय. अशातच आता त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचलाही सोशल मीडियावर ट्रोलर्सनी लक्ष्य केले आहे.

आकाश नेटके | Updated: Mar 29, 2024, 01:09 PM IST
हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा पत्नी नताशाला फटका; नेटकऱ्यांनी केले ट्रोल title=

Hardik Pandya's Wife Natasa Stankovic: मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे आल्यापासून तो टिकेचा धनी बनला आहे. दुसरीकडे पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सची 2024 च्या मोसमातही खराब सुरुवात झाली आहे. पहिले दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सची सुरुवातचा मार्गच कठिण झाला आहे. या सगळ्यात रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्याला कर्णधार पद दिल्याने त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. गेल्या सामन्यात सनराझर्स हैदराबाद विरुद्ध 278 धावांचा पाठलाग करताना हार्दिक आणि त्यांच्या संघाच्या नाकीनऊ आले होते. मात्र आता पराभवामुळे हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकवर टीका केली जात आहे.

बुधवारी आयपीएलच्या आठव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 278 धावांचे आव्हान देऊन मुंबई इंडियन्सवर 31 धावांनी विजय मिळवला. हार्दिक पांड्याने या सामन्यात एक विकेट घेतली आणि 24 धावांची खेळी खेळली. मात्र कर्णधारपदावर असून तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे हार्दिकला मैदानावर वाईटरित्या ट्रोल केले गेले. हार्दिक पांड्याच्या निराशाजनक कामगिरीचा परिणाम त्याची पत्नी नताशाला भोगावा लागत आहे. सोशल मीडियावर नेटकरी हार्दिकच्या पत्नीबद्दल विविध कमेंट करत आहेत.

नताशा स्टॅनकोविकने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिला वाईटरित्या ट्रोल केले जात आहे. कमेंट बॉक्समध्ये तिच्या फोटोंवरुन वाईट कमेंट केल्या जात आहे. दुसरीकडे नताशाला ट्रोल केले जात असल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जे कोणी अशा गोष्टी करत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे असे काही नेटकऱ्यांचे म्हणणं आहे.

Natasa Stankovic post

आयपीएलच्या या आधी हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते. दोन्ही मोसमात हार्दिकचा संघ फायनल पर्यंत पोहोचला होता. गेल्या मोसमात त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण गुजरात टायटन्सने पहिल्याच मोसमात आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. मात्र मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद हार्दिककडे आल्यापासून त्याला टीकेचा सामना करावा लागत असून चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. चाहत्यांकडून रोहित शर्माला कर्णधार करण्याची मागणी देखील केली जात आहे.

दुसरीकडे, हार्दिक पांड्या संघाचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. "सर्वात कठीण सैनिकाची सर्वात कठीण परीक्षा घेतली जाते. आपण या स्पर्धेतील सर्वात कठीण संघ आहोत. फलंदाजीत आपण जे काही साध्य केले आहे त्याच्या जवळ कोणीही येऊ शकत नाही, आपण एकमेकांना मदत करू याची खात्री करूया," असे हार्दिक पांड्याने म्हटलं आहे.