मुंबई : टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना अतिशय चुरशीचा झाला. या सामन्यात दोन्ही टीमसाठी अटीतटीचा सामना होता. हा सामना टीम इंडियाने 4 धावांनी जिंकला. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एका स्फोटक फलंदाजाचा समावेश करण्यात आला होता. हा खेळाडू बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर होता.
आयर्लंड विरुद्ध दुसऱ्या सामन्यात ओपनिंगसाठी संजू सॅमसनला खेळवण्यात आलं. त्याने मॅच विनिंग सामना खेळला. तो टीममध्ये सर्वात जास्त धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. त्याला गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळत नव्हती. हार्दिक पांड्याने ती दिली आणि कमाल झाली.
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात सलामीवीर म्हणून संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला होता. संजू सॅमसनने या संधीचं सोनं केलं. पहिल्या सामन्यात त्याला प्लेइंग. दुसऱ्या सामन्यातही त्याने झटपट खेळून धावा केल्या. या सामन्यात संजू सॅमसनने सामना जिंकून देणारी खेळी खेळली, तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.
संजू सॅमसनने या सामन्यात 42 बॉलमध्ये 77 धावा केल्या. 183.33 च्या स्ट्राईक रेटने खेळताना त्याने 9 चौकार आणि 4 षटकार मारले. संजू सॅमसनच्या कारकिर्दीतील हे पहिले अर्धशतक आहे. या सामन्यापूर्वी त्याची सर्वोत्तम धावसंख्या केवळ 46 होती.
संजू सॅमसनने भारतासाठी आतापर्यंत 15 सामने खेळले असून त्यात त्याने 21.21 च्या सरासरीने 297 धावा केल्या आहेत. संजूने 2015 मध्ये डेब्यू मॅच खेळला होता, पण तो टीम इंडियामध्ये फारशी कामगिरी करू शकला नाही.
टीम इंडियाने आयर्लंड विरुद्ध दोन सामने खेळले. दोन्ही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत मालिका खिशात घातली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये टीम इंडियाला विजय मिळाला. शेवटच्या सामना अटीतटीचा झाला पण 4 धावांनी आयर्लंडवर विजय मिळवला.