INDvsSA: ...म्हणून 'या' माजी खेळाडूने विराटला सुनावलं

दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला दोन मॅचसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे टीम इंडियावर टीका होत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 21, 2018, 03:50 PM IST
INDvsSA: ...म्हणून 'या' माजी खेळाडूने विराटला सुनावलं title=
File Photo

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला दोन मॅचसमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे टीम इंडियावर टीका होत आहे.

पहिल्या दोन टेस्ट मॅचेसमध्ये अजिंक्य रहाणेला टीममध्ये जागा न दिल्याने टीका होत आहे. तर, पहिल्या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला दुसऱ्या टेस्टमध्ये संधी न दिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

एकीकडे माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग यांनी टीम इंडियाचं समर्थन केलं आहे. तर, दुसरीकडे माजी क्रिकेटर मनोज प्रभाकर यांनी टीम इंडियावर टीकास्त्र सोडलं आहे. 

टीम इंडियाने इनिंगमधील पहिल्या २० ओव्हर्समध्ये चांगली बॅटिंग आणि बॉलिंग करायला पाहिजे असं मतं मनोज प्रभाकर यांनी व्यक्त केलं आहे.

Manoj Prabhakar criticizes selection process
File Photo

भारतासाठी १९९०च्या दशकात बॅटिंग आणि बॉलिंगची भूमिका निभावणाऱ्या प्रभाकर यांनी म्हटलं की, दक्षिण आफ्रिकेत पहिल्या २० ओव्हर्समध्ये भारताने चांगलं प्रदर्शन दाखवलं नाही तर विजय मिळवणं कठीण आहे.

"जर तुम्ही समोरील येणाऱ्या बॉलचा सामना करु शकत नाही तर पीचवर तुम्ही टिकू शकत नाही. कधी-कधी बॉल सोडणं ही महत्वाचं आहे. मी सुद्धा ओपनिंग बॅट्समन होतो आणि मी संघर्ष करु शकलो तर ते का नाही करु शकत?" असंही प्रभाकर यांनी म्हटलं.

भुवनेश्वरला दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये न घेतल्याने प्रभाकर यांनी आश्चर्य व्यक्त करत म्हटलं की, भुवनेश्वर या पिचवर बॉलिंग करु शकत नाही असं कसं म्हणता येईल. भुवनेश्वर सारखा चांगला बॉल असताना आपण त्याला संधी का देत नाहीये?