डबल सेंच्युरी करणाऱ्या रोहितची आफ्रिकेत विकेट, बनला 'हा' लाजीरवाणा रेकॉर्ड

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये विराट कोहली व्यतिरिक्त इतर बॅट्समनचं प्रदर्शन पुन्हा खराब झालं.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 15, 2018, 01:29 PM IST
डबल सेंच्युरी करणाऱ्या रोहितची आफ्रिकेत विकेट, बनला 'हा' लाजीरवाणा रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये विराट कोहली व्यतिरिक्त इतर बॅट्समनचं प्रदर्शन पुन्हा खराब झालं.

टीममध्ये बदल करुन केएल राहुलला टीममध्ये संधी देण्यात आली. मात्र, केएल राहुललाही चांगली इनिंग खेळण्यात अपयश आलं. त्याने केवळ १० रन्स केले. त्यापेक्षा मुरली विजयने चांगली इनिंग खेळत ४६ रन्स केले. चेतेश्वर पुजारा शुन्यावर आऊट झाला तर रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला.

अजिंक्य रहाणेच्या जागेवर खेळत असलेला रोहित शर्मा पहिल्या टेस्टमधील दोन्ही इनिंगमध्ये लकरच आऊट झाला. दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये रहाणेकडून खूप अपेक्षा होत्या. पिच पाहता या मैदानात भारतीय टीम चांगलं प्रदर्शन करेल असं वाटत होतं मात्र, टॉप ऑर्डर पुन्हा एकदा अपयशी ठरली. केवळ विराटने चांगलं प्रदर्शन केलं.

सर्वात मोठा झटका पुजारानंतर रोहित शर्मा आऊट झाल्याने लागला. रोहितने पहिल्या टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये ११ रन्स केले. तर, दुसऱ्या इनिंगमध्ये १० रन्स केले. रोहितने दुसऱ्या टेस्ट मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये केवळ १० रन्स करुन आऊट झाला. इतकचं नाही तर रोहित शर्माने एक लाजीरवाणा रेकॉर्डही आपल्या नावावर केला आहे.

दक्षिण आफ्रिकेत सर्वात कमी सरासरीने रन्स बनवणाऱ्यांच्या यादीत आता रोहितचा समावेश झाला आहे. रोहितने आफ्रिकेच्या मैदानात आतापर्यंत ९.२७च्या सरासरीने रन्स बनवले आहेत.

दक्षिण आफ्रिकेत सर्वात कमी सरासरीने रन्स बनवणारे खेळाडू  

सरासरी              खेळाडू 
५.२९            व्यंकटेश प्रसाद
५.४४               ईशांत शर्मा
६.२२               पॉल हॅरिस 
७.७८            मखाया नतिनी 
८.५०            जवागल श्रीनाथ
९.२७              रोहित शर्मा

सर्वात कमी सरासरीने रन्स बनवणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर, रोहित शर्माच्या आधीचे पाच जण हे बॉलर्स असून रोहित एकटाच बॅट्समन आहे.