Rohit Sharma : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) आजचा दिवस खूप खास आहे. आज 30 एप्रिल असून रोहितचा वाढदिवस आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma Birthday) आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करतोय. हिटमॅनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतायत. अशातच टीम इंडियाचा आणि राजस्थान रॉयल्सचा स्पिनर युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं महागात पडलं आहे.
आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. रोहित शर्माचा आज वाढदिवस असल्या कारणाने आजचा सामना देखील रोहित शर्मा आणि त्याची टीम जिंकण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. दरम्यान रोहितचा वाढदिवस असतानाच त्याची पत्नी रितिकाने (Ritika Sajdeh) युझवेंद्र चहलवर चोरीचा आरोप लावला आहे.
रोहितच्या वाढदिवसानिमित्त रोहित शर्माचं हैदराबादला सर्वात मोठं पोस्टर तयार करण्यात आलंय. तर अनेक चाहते आणि सेलिब्रिटी रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतायत. अशातच चहलनेही रोहितला शुभेच्छा दिल्यात.
रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चहलने लिहिलंय, जगातील सर्वात लाडक्या भावाला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला जगात सर्वात अधिक हसवणारा, जगातील माझा सर्वात चांगल्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
दरम्यान युझवेंद्र चहलाच्या या पोस्टवरून रितीका सजदेहने त्याच्यावर चोरीचा आरोप लावलाय. मुळात युझीने हे कॅप्शन रितीकाचं चोरलं होतं. ज्यावरून रितीकाने तिची प्रतिक्रिया दिली आहे.
युझीने आपली पोस्ट चोरलेली पाहताच, रितीकाने त्याच्या या पोस्टवर लिहिलं की, 'तु माझ्या नवऱ्याला चोरलंय, तर आता तू माझं कॅप्शनही देखील चोरू शकतोस.' रितिकाची ही कमेंट पाहून चाहत्यांनी मात्र यावरून फार मजा घेतलीये. दरम्यान रितीकानेही खास अंदाजात चहलची मजा घेतली आहे.
The banter between Yuzvendra Chahal and Ritika Sajdeh. pic.twitter.com/VvYdBo9eeR
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 30, 2023
आपण सर्वजण रोहित शर्माला सर्रासपणे हिटमॅन म्हणतो. मात्र रोहित शर्माला हे खास नाव कोणी दिलंय, याची तुम्हाला कल्पना आहे का? रवी शास्त्री यांनी एकदा कॅमेंट्रीच्या माध्यमातून रोहित शर्माला हे नवं नाव दिलं होतं. त्यावेळी कॉमेंट्री करताना रवी शास्त्री म्हणाले होते की, "वनडे इंटरनॅशनलमध्ये 200 पूर्ण करण्याची ही कोणती पद्धत आहे, भन्नाट... क्रिकेटला आणखी एक हिटमॅन मिळाला." आणि तेव्हापासून रोहितला हिटमॅन हे नाव पडलं.