Shakib Al Hasan: ...तर शाकिबवर दगडफेक करू; मॅथ्यूजने बांगलादेशी कर्णधाराला दिली धमकी

Threat To Shakib Al Hasan: शाकिब अल हसनने अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट केल्याचा मुद्दा अजूनही गाजतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा मॅथ्यूज पहिला गोलंदाज ठरलाय.

सुरभि जगदीश | Updated: Nov 9, 2023, 12:51 PM IST
Shakib Al Hasan: ...तर शाकिबवर दगडफेक करू; मॅथ्यूजने बांगलादेशी कर्णधाराला दिली धमकी title=

Threat To Shakib Al Hasan: नुकतंच वर्ल्डकपमध्ये झालेली बांगलादेश विरूद्ध श्रीलंका यांच्यातील सामना चांगलाच चर्चेत आला. शाकिब अल हसनने अँजेलो मॅथ्यूजला टाईम आऊट केल्याचा मुद्दा अजूनही गाजतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा मॅथ्यूज पहिला गोलंदाज ठरलाय. दरम्यान या प्रकरणानंतर अँजेलो मॅथ्यूजच्या भावाने शाकिब अल हसनना धमकी दिलीये.  

अँजेलो मॅथ्यूजचा भाऊ ट्रेविन मॅथ्यूजने शाकिब अल हसनबाबत हे विधान केलं आहे. BDCricTime च्या माहितीनुसार, ट्रेविन मॅथ्यूज म्हणाला की, या घटनेमुळे आम्ही खूप निराश झालो आहोत. बांगलादेशी कर्णधाराकडे खेळ भावना नावाचा प्रकार नाही. जेंटलमेन गेममध्ये त्याने माणूसकी दाखवली नाही. 

बांगलादेशाच्या कर्णधाराकडून आणि टीममधील इतर खेळाडूंकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती. शाकिबचं श्रीलंकेत स्वागत होणार नाही. जर बांगलादेशाची टीम कोणताही आंतरराष्ट्रीय किंवा लंका प्रीमियर लीग सामना खेळण्यासाठी आली तर त्यांच्यावर दगडफेक केली जाईल. इतकंच नाही तर त्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असंही ट्रेविन मॅथ्यूजने म्हटलंय.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या टीमने 24.2 ओव्हर्समध्ये सदीरा समरविक्रमाच्या रूपात चौथी विकेट गमावली. या विकेटनंतर अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी क्रीजवर आला होता. मॅथ्यूजने खेळपट्टीनंतर हेल्मेट पाहिलं असंत त्याचा स्ट्रॅप तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं. यावेळी त्याने हेल्मेट बदलण्याची ऑर्डर दिली. या सगळ्यात 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. 

वर्ल्डकप खेळाच्या नियमांनुसार, जर एक फलंदाज आऊट झाला तर त्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला 2 मिनिटांच्या आत पुढील बॉल खेळण्यासाठी तयार राहावं लागतं. 

अँजेलो मॅथ्यूजच्या प्रकरणात 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ जात असल्याचं पाहून बांगलादेशच्या एका खेळाडूने कर्णधार शाकिब अल हसन याला टाइम आउट करण्यास सांगितलं. यावेळी कर्णधारानेही तसंच केलं. अंपायरनेही शाकिबला खरोखर हे करायचे आहे का? असं विचारलं, यावर शाकिबने दुजोरा दिला. यादरम्यान मॅथ्यूजने त्याच्या हेल्मेटचा तुटलेला पट्टा अंपायर आणि शकीबलाही दाखवला. पण बांगलादेशी कर्णधाराने अपील मागे घेतलं नाही आणि अखेर मॅथ्यूजला आऊट देण्यात आले.