चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने २६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात हार्दिक पांड्या आणि महेंद्र सिंग धोनी यांनी संयमी खेळी करताना भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. फलंदाजांसह गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात डळमळीत झाली. आरोन फिंचच्या जागी सलामीवीर म्हणून मैदानात उतरलेला हिल्टन कार्टराईट लवकर बाद जाला. बुमराहने त्याची विकेट घेतली. पांड्याने फलंदाजीसह गोलंदाजीतही कमाल दाखवली त्याने दोन विकेट घेतल्या. पांड्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथला झेलबाद केले.
बुमराहरने स्थिमथला बाद करण्यासाठी चक्क उलटी धाव घेतली. पाचव्या ओव्हरमध्ये स्मिथने पांड्याच्या चेंडूवर फटका मारला. चेंडू हवेत उंच उडाला. बुमराह शॉर्ट फाईन लेगवर उभा होता. यावेळी उलट दिशेने धावत बुमराहने झेल घेतला.