कोकण रेल्वे

मुंबई- कोकणात मुसळधार पाऊस, कोकण रेल्वे रखडली

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसर आणि कोकणाला पावसानं झोडपून काढलंय.  मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. शनिवारी विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात जोर धरलाय.

Jun 21, 2015, 01:52 PM IST

कोकण रेल्वे आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा 'प्रभू' पावला!

कोकण रेल्वेला आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रभू पावलाय. देशाची राजधानी दिल्ली ते राज्याची उपराजधानी नागपूर आता बुलेट ट्रेननं जोडली जाणार आहे. दिल्ली ते चेन्नई बुलेट ट्रेन होणार आहे. त्याचा हा दिल्ली ते नागपूर असा पहिला टप्पा असणार आहे. त्यासाठी चिनी कंपनी काम करणार आहे अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली.

Jun 11, 2015, 10:00 PM IST

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज! पाहा कोकणप्रेमींसाठी काय खास!

पावसाळ्यात कोकण रेल्वेवर दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडतांना पाहतो. ते टाळण्यासाठी यंदा कोकण रेल्वेनं काय उपाययोजना केल्यायेत पाहूयात.

Jun 10, 2015, 10:02 PM IST

कोकण रेल्वेचा प्रवासी पंधरवडा, स्थानके होणार चकाचक

कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवासी सुविधा पंधरवड्यानिमित्ताने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यासाठी प्रवाशांशी चर्चा व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी केली. तसेच झीरो वेस्ट स्टेशन संकल्पनेतून कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्टेशन स्वच्छ केली जाणार आहेत. रेल्वेने रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्यसाधून हा पंधरवडा साजरा करण्याचे ठरविले आहे.

Jun 4, 2015, 01:31 PM IST

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार : अनंत गिते

कोकणवासियांसाठी सर्वात मोठी खुषखबर. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी केलीय. 

May 27, 2015, 04:31 PM IST

कोकण रेल्वे फुल्ल, गणपतीसाठी जाणाऱ्यांना वेटींगचे तिकीट

गणपतीसाठी दरवर्षी गावाला जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांचा पुन्हा एकदा कोकण रेल्वेने घात केला. यंदा १७ सप्टेंबरला गणेशचतुर्थीचा सण येतोय. त्यामुळं १२० दिवस आधी रेल्वेच्या अॅडव्हान्स बुकिंगसाठी तिकीट विंडोबाहेर चाकरमान्यांनी रात्रभर लाइन लावली. मात्र एवढं करूनही अनेकांच्या नशिबी वेटिंग तिकीटच आलं.

May 19, 2015, 07:34 PM IST

कोकण रेल्वेच्या आठ विशेष तात्काळ फेऱ्या

कोकण रेल्वे मार्गावर आणखी आठ विशेष तात्काळ फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जाणा-या प्रवाशांची संख्या वाढतच असून, गर्दीमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या फेऱ्या आहेत.

May 17, 2015, 04:13 PM IST

कोकण रेल्वेचे मुख्यालय गोव्याला हलविण्यास राणेंचा विरोध

कोकण रेल्वेचे मुख्यालय नवी मुंबईतील बेलापूर येथून थेट मडगाव, गोवा येथे हलविण्यात येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याला कोकणातील नागरिकांचा विरोध आहे. त्यातच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही तीव्र आक्षेप घेत विरोध केलाय. याबाबत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना थेट पत्रच पाठविले आहे.

Apr 29, 2015, 03:12 PM IST

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात 10 जूनपासून बदल

कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात खबरदारी म्हणून रेल्वेचा वेग कमी केला जातो. त्यामुळे मान्सून वेळापत्रक कोकण रेल्वेकडून जाहीर करण्यात येते. मान्सून वेळापत्रकाप्रमाणे गाड्या सोडण्यात येतात. 

Apr 21, 2015, 01:54 PM IST

कोकण रेल्वेची स्वच्छता मोहीम, २० किलो कचऱ्याला ५० रुपये

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांत जेवण बनवताना होणारा कचरा सध्या रेल्वेमार्गांतच टाकला जातो. तो एका पिशवीत जमा करून रत्नागिरी आणि मडगाव स्थानकांवर रेल्वे कर्मचाऱ्यांना देऊन त्यांना २० किलोमागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली. 

Mar 6, 2015, 07:37 PM IST