कोकण रेल्वे

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कोकण रेल्वेच्या गाड्या लेट

पेण-रोहादरम्यान साडेचार तासांचा मेगाब्लॉक मध्ये रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून काही गाड्या रद्द केल्यात. तर कोकणकन्या उशिराने धावणार आहे.

Jan 9, 2015, 05:29 PM IST

कोकण रेल्वेमध्ये सहायक स्टेशन मास्टर 45 जागांवर भरती

कोकण रेल्वेमध्ये सहायक स्टेशन मास्टरच्या 45 जागा भरावयाच्या आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. ही संधी कोकण, गोवा आणि कर्नाटक राज्यातील भूमीपूत्र उमेदवारांना आहे.

Jan 9, 2015, 04:56 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर शताब्दी प्रीमियम

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूश खबर आहे. कोकण रेल्वे मार्गावर शताब्दी प्रीमियम गाड्यांच्या १२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई सीएसटी-करमाळी दरम्यान शताब्दी प्रीमियम गाडी धावणार आहे.

Dec 18, 2014, 07:58 AM IST

कोकण रेल्वेचे मोबाईल अॅप सुरु

कोकण रेल्वेने आपले स्वत:चे मोबाईल अॅप सुरु केले आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेची माहिती स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणार आहे.

Nov 25, 2014, 05:46 PM IST

हजार जीवांचं मोल अवघे ३०० रुपये...

रेल्वेचा ट्रॅक तुटल्याचं लक्षात येताच जीवाची बाजी लावून एक्सप्रेस थांबवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाला कोकण रेल्वेनं बक्षीस जाहीर केलंय... हे बक्षीस आहे अवघे ३०० रुपये...

Nov 14, 2014, 02:10 PM IST

ट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळं टळला कोकण रेल्वेवरील अपघात

कोकण रेल्वेमार्गावरील एका ट्रॅकमनच्या प्रसंगावधानामुळं कोकणकन्या एक्स्प्रेसचा अपघात टळला आहे. सचिन पाडावे असं त्या ट्रॅकमनचं नाव आहे.

Nov 10, 2014, 05:34 PM IST

कोकण रेल्वेत नवा 'घर घोटाळा'

कोकण रेल्वेत नवा 'घर घोटाळा'

Nov 7, 2014, 08:57 PM IST

कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक, नोव्हेंबरपासून बदल

कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रक उद्यापासून दि. १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या धावणार आहेत.

Oct 31, 2014, 04:29 PM IST

कोकण रेल्वे ठप्पच, नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल

कोकण रेल्वे मार्गावर खेर्डी ते कामथे स्थानका दरम्यान मालगाडी घसरल्याने ठप्प पडलेली वाहतूक दुसऱ्या दिवशी ठप्पच होती. रेल्वे प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रवाशांचे हाल झालेत.

Oct 8, 2014, 03:17 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर मालगाडी घसरुन वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रद्द

कोकण रेल्वे मार्गावर चिपळूणनजीक खेर्डी येथे मालगाडी घसरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर, सीएसटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर आदींसह अनेक गाड्या रद्द करम्यात आल्या.

Oct 7, 2014, 10:16 AM IST

कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी विशेष गाडी

कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी  विशेष  गाडी सोडण्यात आली आहे. मडगाव ते एलटीटी आणि करमाळी ते एलटीटी अशा चार फेर्‍या चालवण्यात येणार आहेत. 

Sep 27, 2014, 04:02 PM IST

कोकण रेल्वेची गुडन्यूज, प्रवाशांना तीन दिवस आधी मिळणार तिकीट

कोकणात  जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक गोडबातमी आहे. कोकणात जाताना आरक्षण मिळाले नाही, तर अनेकांना टेंशन येते. मात्र, ते घेण्याची गरज नाही. कारण तीन दिवस आधी रेल्वेचे तुम्हाला तिकिट काढता येणार आहे. तशी व्यवस्था कोकण रेल्वेने केली आहे.

Sep 25, 2014, 10:37 AM IST

रेल्वेची कोकणवासियांना दिवाळी गिफ्ट

रेल्वेची कोकणवासियांना दिवाळी गिफ्ट

Sep 16, 2014, 01:17 PM IST

कोकण रेल्वेत निकृष्ट भोजन, कंत्राटदाराला लाखाचा दंड

निकृष्ट भोजन दिल्याप्रकरणी आलेल्या तक्रारीनंतर कोकण रेल्वेने कॅटरींग कंत्राटादाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Sep 4, 2014, 02:34 PM IST