कोकण रेल्वे

'कोरे'चा प्रवास : सिग्नल यंत्रणेत बिघाड, काही गाड्या रद्द

 ऐन गणपतीच्या तोंडावर कोकण रेल्वेचा प्रचंड खोळंबा झालाय. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घराकडे निघालेल्या कोकणवासियांचे अतोनात हाल होतायत. त्यातच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास कटकटीचा झालाय. आज अनेक गाड्या पाच ते सहा तास उशिरा धावत अाहेत. जनशताब्दी एक्सप्रेस ठाणे स्थानकात दोन तास रोखून धरण्यात आली होती.

Aug 27, 2014, 07:49 AM IST

दुरूस्तीच्या कामामुळे कोकण रेल्वे रडतखडत

 महाडनजीकच्या कंरजाडीनजीक रेल्वेनं दुरुस्तीचं काम काढलं आहे. यामुळे मांडवी एक्सप्रेस मागील चार तासांपासून रत्नागिरीत अडकून पडली आहे. शिवाय इतर गाड्या यामुळे खोळंबण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी कोकण रेल्वेवर ओढावलेलं खोळंब्याचं विघ्न अद्यापही कायम आहे.

Aug 26, 2014, 10:36 PM IST

कोकण रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा, एकेरीमार्गामुळे कोंडी

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासाचे विघ्न काही केल्या संपण्याच्या मार्गावर नाही. खेडजवळील करंजाडी येथे मालगाडीचे सात डब्बे घसल्याने तब्बल २५ तास वाहतूक ठप्प होती. तर त्याआधी नव्याने सुरु झालेली डबल डेकर ट्रेन रोह्याजवळ मध्य आणि कोरेच्या वादामुळे एकतास उभी करण्यात आली होती. आता तर अनेक गाड्या जादा गाड्या सोडल्यामुळे एकेरीमार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना हा प्रवास नकोसा झालाय.

Aug 26, 2014, 02:10 PM IST

तब्बल 26 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू

कोकण रेल्वेवरील ट्रॅक दुरुस्तीचं काम पूर्ण झालंय. तब्बल 26 तासांनंतर रेल्वे वाहतूक सुरू झालीय. वीर आणि करंजाडीदरम्यान कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे 7 डब्बे घसरल्यामुळं कालपासून वाहतूक ठप्प होती. 

Aug 25, 2014, 09:31 AM IST

बाप्पा! मालगाडीचे 7 डबे घसरले, कोकण रेल्वे ठप्प

कोकण रेल्वेच्या दोन्ही मार्गावरची वाहतूक ठप्प झालीय. करंजाडी जवळ मालगाडीचे सात डबे घसरल्यानं ही वाहतूक ठप्प झालीय. 

Aug 24, 2014, 08:50 AM IST

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 20 प्रिमियम एसी डबल डेकर

गणेशोत्सवात कोकणात जाणा-या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वे गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि  करमाळी दरम्यान 20 प्रिमियम एसी डबल डेकर विशेष रेल्वे चालविण्यासाठी निर्णय घेतला आहे.

Aug 13, 2014, 04:18 PM IST

गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक

कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवासाठी तब्बल १२४ विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष ९0 रेल्वे गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यात ५२ आरक्षित आणि ३८ अनारक्षित रेल्वेंचा समावेश आहेत. यातील २ गाड्या या कोल्हापूरसाठी आहेत. या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Jul 15, 2014, 11:09 AM IST

गणेश भक्तांवर मध्य रेल्वे 'प्रसन्न'

गणपतीसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांवर मध्य रेल्वे प्रसन्न झालीय.

Jul 14, 2014, 11:45 PM IST

कोकण रेल्वे पोलिसांची अशीही दक्षता...

कोकण रेल्वेमध्ये तृतीय पंथीचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईच्यावेळी एक वेगळीच घटना पुढे आली. घरातून पळालेला 14 वर्षीय शाळकरी मुलगा कोकण रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे त्या मुलाला आई-वडिलांकडे सोपविण्यात आले.

Jul 9, 2014, 03:40 PM IST

...तर खरोखरच भारतात धावू शकेल 300च्या स्पीडनं ट्रेन

 भारतीय इंजिनिअर्सना जर संधी दिली तर भारतीय रेल्वेही 300 किलोमीटर प्रति तासच्या स्पीडनं धावू शकते. हे आम्ही नाही तर कोकण रेल्वेचे पूर्व प्रबंध निदेशक आणि प्रसिद्ध विशेषज्ज्ञ बी. राजाराम यांनी म्हटलंय. मात्र यासाठी भारतीय रेल्वेला आपला नेहमीचा खाक्या सोडावा लागेल. 

Jul 7, 2014, 05:09 PM IST