दिवाकर रावते

रिक्षा परवान्यांची लॉटरी जाहीर, महिलांसाठी राखीव परवाने पडून

रिक्षा परवाने मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांसाठी  मंगळवारी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. यावेळी, राज्यातील ४२,७९८ रिक्षा परवान्यांसाठी लॉटरी काढण्यात आली. विजेत्यांना 'एसएमएस'द्वारे याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.

Jan 13, 2016, 12:39 PM IST

वाहतूक मंत्री दिवाकर रावतेंच्या गाडीला अपघात

राज्याचे वाहतूक मंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या गाडीला मुंबईत अपघात झाला आहे, या अपघातात रावते सुदैवाने बचावले आहेत. रावते यांच्या ड्रायव्हरला मुका मार लागला आहे. 

Jan 6, 2016, 07:12 PM IST

एसटीचा संप मागे, दिवाकर रावते यांची मध्यस्ती

२५ टक्के पगारवाढ देण्यात यावी या मागणीसाठी काल पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप आज मागे घेतला. त्यामुळे प्रवाशांचे कालपासून होणारे हाल टळण्यास मदत झालेय.

Dec 18, 2015, 03:09 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ही घोषणा केलीय. एसटी कर्मचाऱ्यांना सध्या १०७ टक्के दरानं महागाई भत्ता दिला जातो. या निर्णयामुळं आता तो ११३ टक्के झालाय. 

Oct 22, 2015, 12:02 AM IST

एसटीचा भोंगळ कारभार उघड, ११ कोटींहून अधिक प्रवाशांची एसटीकडे पाठ

एसटीच्या भोंगळ कारभारामुळं वर्षभरात तब्बल ११ कोटी ३२ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याशिवाय एसटीचा संचित तोटा १ हजार ९३४ कोटींवर पोहचला आहे. मात्र तरीही एसटीची सेवा आणि सुविधा सुधारण्यासाठी प्रशासन आणि सरकारकडून कोणतंही पाऊल उचललं जात नसल्याचं दिसतं.

Sep 23, 2015, 10:06 PM IST

हेल्मेटशिवाय बाईक चालवणाऱ्या पोलिसांची परिवहन मंत्र्यांनी फाडली पावती

मुंबईतील मरीन ड्राईव्हवर आज एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. एरवी विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या दोन पोलिसांची पावती आज परिवहन मंत्र्यांनीच फाडली. 

Jul 20, 2015, 08:39 PM IST

रावतेंकडून लालू यादव, नितीश कुमारांची फिरकी

दादर येथील रेल्वेच्या कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारचे माजी रेल्वे मंत्र्यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Jun 29, 2015, 06:04 PM IST

तंबाखू जर्दींना एसटीचा दूरूनच 'राम राम'!

तंबाखू खाणा-यांना यापुढं एसटीमध्ये नोकरी मिळणार नाहीय. कारण, एसटी कर्मचाऱ्यांची भरती करतानाच, 'मी व्यसन करणार नाही' असा बॉन्ड लिहून घेण्यात येणार आहे. 

May 29, 2015, 06:23 PM IST