'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस'ला स्क्रीन नाकारले!
करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' आणि शाहरुखच्या 'रईस' सिनेमाच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स मालकांच्या असोसिएशननं या सिनेमासाठी स्क्रिन उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार दिलाय.
Oct 14, 2016, 03:25 PM ISTपाकिस्तान 16 देशांसोबत करणार लष्करी सराव
सैन्याची शारिरीक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी पाकिस्तान पुढील आठवड्यात लष्करी सराव करणार आहे. यात 16 देश सहभागी होणार आहेत.
Oct 14, 2016, 02:41 PM ISTपाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गुप्त माहिती पुरविल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरमधील पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन कऱण्यात आलेय.
Oct 14, 2016, 11:43 AM ISTचंदू चव्हाण इस्लामाबादमध्येच - पाक डीजीएमओ
अनावधानाने नियंत्रण रेषा ओलांडून चुकून पाकिस्तानमध्ये गेलेले राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू चव्हाण इस्लामाबादमध्ये पाकच्या ताब्यात आहे. पाकिस्तानच्या DGMOने चंदू चव्हाण चुकून नियंत्रण रेषा ओलांडून पाकमध्ये आला होता. त्यानंतर त्याला पाक लष्करानं ताब्यात घेतल्याची माहिती पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
Oct 13, 2016, 08:57 PM ISTदेश कायद्याने चालतो, ज्याला मान्य नाही त्यांनी पाकिस्तानात जा - साक्षी महाराज
तीन तलाकवर आता वादाला सुरुवात झाली आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रेस कॉन्फ्रेंस करत जाहीर केलं की, ते तीन तलाक आणि यूनिफॉर्म सिविल कोडच्या मुद्द्यावर सरकारचा विरोध करणार आहेत. तर भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी देखील देश हा कायद्याने चालेल फतव्याने नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Oct 13, 2016, 06:06 PM IST'सर्जिकल स्ट्राईक' भारताचा सुरक्षा अधिकार - अमेरिका
भारतानं पाकिस्तान विरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आता अमेरिकेनंही पाठिंबा दर्शवलाय. काश्मीर मुद्यासंबंधी अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलंच फटकारलंय.
Oct 13, 2016, 03:31 PM ISTसंयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचा पाकिस्तानवर पुन्हा एकदा हल्लाबोल
संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला आहे. भारताने म्हटलं की, दहशतवादाला पांठिबा देणं शांती आणि स्थिरतेला धोका आहे. अणु बॉम्बची धमकी देणाऱ्यांविरोधात जगाने एकजूट झालं पाहिजे.
Oct 12, 2016, 07:31 PM ISTनवाज शरीफ यांना घरातून होऊ लागला विरोध
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना घरातूनच आता आव्हान मिळत आहे. नवाज यांची मुलगी मरियम नवाज हिला पीएमएल (एन) या पक्षाची पक्षप्रमुख बनवण्याचा शरीफ यांचा विचार आहे. पण भाऊ शहबाज शरीफ यांनी याला विरोध केला आहे.
Oct 12, 2016, 05:36 PM ISTपाकिस्तानसाठी चीनची बडबड गीते
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, चीनने भारताला इशारा दिला आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला वेगळे पा़डण्याचे भारताचे प्रयत्न आहेत, हे राजकीय फायद्यासाठी असून चुकीचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.
Oct 11, 2016, 11:37 AM ISTभारताशी मैत्री कायम ठेवत भूतानचा पाकला जोरदार झटका
भारताशी भूटानची असलेली मैत्री कायम ठेवत भूताननंदेखील पाकिस्तानला जोरदार झटका दिलाय.
Oct 11, 2016, 10:59 AM ISTपाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 11:15 PM ISTपाकिस्तानातील हालचाली पाहता भारतानेही केली युद्धाची तयारी
पाकिस्तानच्या भारताविरोधातील कारवायांना चोख प्रत्त्यूतर देण्यासाठी भारत देखील पूर्णपणे तयार झाला आहे. उद्याजर युद्धाची वेळ आली तर भारताकडून युद्धाची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. भारत सरकारने सगळ्या शस्त्र पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना अतिरिक्त शस्त्रे पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.
Oct 10, 2016, 09:11 PM ISTपाकिस्तानी नेता करतोय भारताला डिवचण्याचा प्रयत्न
पाकिस्तानातील प्रसार माध्यमांमध्ये अतीक अहमद हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. हा पाकिस्तानी नेता भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे की, 'पाकिस्तान सोबत युद्ध झालं तर गोळ्या नाही मोजल्या जाणार.'
Oct 10, 2016, 05:27 PM ISTसेहवागची पाकिस्तान विरोधातली फटकेबाजी
वीरेंद्र सेहवागची तडाखेबाज फलंदाजी आपण पाहिली असेल, वीरेंद्र सेहवाग नेहमीच स्वतंत्रपणे खेळला.
Oct 10, 2016, 04:43 PM ISTपाकिस्तानच्या या माजी क्रिकेटरने दिलं भारताला आव्हान
भारतीय लष्काराने पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानमधून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इंजमाम उल हकने देखील यावर प्रतिक्रिया देत भारताला आव्हान दिलं आहे.
Oct 9, 2016, 10:04 PM IST