विधानसभा २०१४

गरज पडल्यास शिवसेनेशी पुन्हा युती करू - गडकरी

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गरज पडल्यास शिवसेनेशी पुन्हा युती करण्याचे संकेत दिले आहेत. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आतापर्यंतचे महाराष्ट्राचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याचं ते म्हणाले. 

Oct 2, 2014, 12:10 AM IST

जयंत पाटलांविरोधात सर्व विरोधक एकवटले

इस्लामपूर मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या विरोधात विरोधक एकवटले आहेत. 

Oct 1, 2014, 09:34 PM IST

दादांचे आदेश बसवले धाब्यावर, पिंपरी-चिंचवड मतदारसंघात घडतंय काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांची त्यांच्या कार्यकर्त्यांवर चांगलीच पकड आहे. पण नेमकं पिंपरी चिंचवडमध्ये मात्र बऱ्याचदा त्यांच्या आदेशाला केराची टोपली मिळते. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्ययही आला. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ही त्याचा प्रत्यय येतोय. 

Oct 1, 2014, 09:15 PM IST

मिमिक्री करायची असेल तर राज ठाकरेंनी फिल्म इंडस्ट्रीत जावं - राखी सावंत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरपीआय नेते रामदास आठवले यांच्यावर केलेल्या टीकेला राखी सावंतनं प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरेंना मिमिक्री करण्याची हौस असेल तर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जावं असा सल्लाच राखी सावंतनं दिलाय. 

Oct 1, 2014, 08:34 PM IST

नाशकात रंगलं उमेदवारांच्या माघारीवरून नाट्य

नाशिक शहरातल्या 4 मतदारसंघात आज उमेदवारीच्या माघारीवरून चांगलंच नाट्य रंगलं. तब्बल 9 उमेदवारांनी माघार घेतल्यानं अनेकांनी सुस्कारा टाकला तर काही ठिकाणी माघार न घेतल्यानं ताणतणाव होता. मतविभागणीनेच विजय सुकर होणार असल्यानं प्रचारापेक्षा आज सर्वांचंच लक्ष्य राजकीय घडामोडींकडे लागलं होतं.

Oct 1, 2014, 08:21 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - नाशिक मध्य

नाशिक मध्य विधानसबा मतदारसंघ वेगळ्याच कारणाने सध्या चर्चेत आहे. ज्या मनसेनेने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा आधार घेत नाशिक पालिकेत आपली सत्ता राखण्यास यश मिळविले आहे. राष्ट्रवादी-मनसेची झालेली महापालिकेतील अजब युती. या नव्या समीकरणांमुळे यावेळची विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगणार आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार वसंत गीते आहेत.

Oct 1, 2014, 07:56 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - नांदगाव, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघ. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ इथे विद्यमान आमदार आहेत. पाच वर्षांतली विकासकामे आणि आगामी निवडणुकीत पंकज भुजबळ यांच्यापुढे काय आव्हानं असणार आहे. 

Oct 1, 2014, 07:50 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - बल्लारपूर, चंद्रपूर

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचा हा मतदारसंघ. मुनगंटीवार यांनी बल्लारपूरमधून चारवेळा आमदारकी भुषवली आहे. मुनगंटीवार यांचा विजयाचा हा महामेरू रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

Oct 1, 2014, 07:24 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - अहेरी,गडचिरोली

 आर. आर.पाटील पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघ. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम या दोन नेत्यांमध्ये इथे संघर्ष पाहायला मिळतो. मात्र दीपक आत्राम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत इथे आमदारकी मिळवली. 

Oct 1, 2014, 07:15 PM IST

ऑडीट विधानसभा मतदारसंघ - वरोरा-भद्रावती, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक आमदाराला जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचे भाग्य साधारण १७ वर्षांनी लाभले. अर्थात जिल्ह्यातील आमदार आणि तोही २० वर्षे आमदारकी भोगलेला म्हटल्यावर मतदारांच्या अपेक्षाही वाढल्या. संजय देवतळे हे येथील आमदार. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ.

Oct 1, 2014, 07:05 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - कोपरी-पाचपाखाडी, ठाणे

ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ. शिवसेनेचे एकनाथ शिंदे इथे विद्यमान आमदार आहेत. आगामी विधानसभेसाठी मनसे आणि काँग्रेसनेही इथे जोरदार फिल्डिंग लावली आहे.

Oct 1, 2014, 06:55 PM IST

स्वतंत्र विदर्भाला मनसेचा विरोधच – राज ठाकरे

 वेगळ्या विदर्भाची मागणी ही काही व्यक्तींच्या राजकीय सत्तासुखासाठीची आहे. जिजाऊचा जन्म विदर्भाच्या मातीतला. त्यामुळं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला तोडण्याचे पाप कदापीही करू देणार नाही, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केलीय. 

Oct 1, 2014, 06:25 PM IST