सुप्रीम कोर्ट

नगरसेविकेचं पद रद्द, महायुतीला धक्का!

ठाण्यातील नगरसेविकेचं पद रद्द करण्यात आलंय. सुप्रीम कोर्टानं नगरसेविकेला दणका दिलाय. मात्र, यामुळे ठाण्यातील महायुतीलाच धक्का बसलाय.

Jul 15, 2013, 03:03 PM IST

एलबीटी भरावाच लागेल – सुप्रीम कोर्ट

एलबीटीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेल्या व्यापाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सुप्रीम कोर्टानं एलबीटीविरोधात दाखल केलेल्या सर्वच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यात.

May 10, 2013, 04:09 PM IST

सीबीआय म्हणजे सरकारचा पाळीव पोपट- सुप्रीम कोर्ट

सीबीआय म्हणजे सरकारचा पाळीव पोपट आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेत. कोळसा खाण घोटाळा प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत कोर्टानं सरकार आणि सीबीआयला कठोर शब्दांत खडसावलं.

May 8, 2013, 11:47 PM IST

राज, ओवेसी यांना लगाम घाला – सुप्रीम कोर्ट

आपल्या प्रक्षोभक भाषणांनी समाजात तेढ निर्माण करणे किंवा द्वेषाची भावना वाढविणाऱ्या राजकीय आणि धार्मिक नेत्यांवर कारवाई करण्याची हिंमत केंद्र आणि राज्य सरकारने दाखवावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

Apr 30, 2013, 09:03 PM IST

'त्रिशाला'ला भेटण्यासाठी संजय दत्त आतूर...

मुंबई बॉम्बस्फोटात अवैधपणे हत्यारं बाळगल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.त्या शिक्षेनुसार संजय दत्तला येती पाच वर्ष आपली मुलगी त्रिशालाला भेटता येणार नाही.संजयची मुलगी त्रिशाला ही अमेरीकेत वास्तव्यास असून अमेरीकी कायद्यानुसार कोणत्याही अपराधीला देशात प्रवेश करण्यासाठी परवाना मिळत नाही.

Apr 2, 2013, 11:30 AM IST

‘संजय दत्तऐवजी मला तुरुंगात टाका…’

संजय दत्त याला सुप्रीम कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर अवघं बॉलिवूड दु:खी झालंय. अनेकांनी संजयच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि आपलं दु:ख व्यक्त केलं. याच दु:खीतांमध्ये आयटम गर्ल राखी सावंतचं नाव सर्वात अगोदर घ्यावं लागेल. कारण, राखी संजयसाठी जेलमध्ये जाण्यासही तयार झालीय.

Mar 26, 2013, 04:08 PM IST

१९९३ बॉबस्फोट निकाल : याकूब मेमनची फाशी कायम

१९९३ साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून येणं सुरु झालंय. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं खटल्यातील प्रमुख आरोपी याकूब मेमन याची फाशीची शिक्षा कायम ठेवलीय.

Mar 21, 2013, 11:59 AM IST

१९९३ बॉम्बस्फोट : आज ऐतिहासिक निकाल

१९९३ बॉ़म्बस्फोटांप्रकरणी आज ऐतिहासिक फैसला होणार आहे. या खटल्याचा निकाल आज सुप्रीम कोर्टात लागणार आहे.

Mar 21, 2013, 08:06 AM IST

सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्राच्या बाजूने निकाल

महाराष्ट्र-आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बाभळी बंधाराच्या बाधकामाविरोधातली आंध्राची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळं महाराष्ट्राला दिलासा मिळाला असून बाभळीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Feb 28, 2013, 09:42 PM IST

मुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांनी दाढी राखावी का?

मुस्लिम पोलीस अधिकाऱ्यांनी दाढी राखावी का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे. चार आठवड्यात यावरील उत्तर सुप्रीम कोर्टाने मागितलं आहे.

Jan 22, 2013, 05:49 PM IST

न्यायाधीश म्हणतात- `पीडित बलात्काराचा आनंद घेऊ शकते`

इंडोनेशियाच्या सुप्रीम कोर्टात नियुक्त होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या एका न्यायाधीशाने बलात्कार पीडित महिलांसंदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

Jan 17, 2013, 01:19 PM IST

SMS पाठवा फक्त दोनशे... SMSवरही आली बंधने !

मोबाईलवरून एसएमएस पाठवणं म्हणजे एक व्यसनच तरूणाईला जडलं आहे. मात्र आता याच एसएमएसवर सुप्रीम कोर्टाने बंधने घातली आहेत.

Dec 4, 2012, 08:45 AM IST

सुप्रीम कोर्टाचा दणका, सुदाम मुंडे जेलमधेच

स्त्री भ्रूण हत्यांप्रकरणी अटकेत असलेल्या बीडचा डॉक्टर डेथ सुदाम मुंडेला सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिलाय. त्यामुळे मुंडेला सहामहिने जेलची हवाच खावी लागणार आहे.

Nov 14, 2012, 10:47 AM IST

`नैसर्गिक साधनसामुग्रीचा लिलाव हाच एकमेव मार्ग नाही`

नैसर्गिक साधनसामुग्रीचा लिलाव हाच एकमेव पर्याय नसून लोकहितासाठी गरज पडल्यास केंद्र सरकारनं थोडं आर्थिक नुकसान करायलाही हरकत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.

Sep 27, 2012, 04:08 PM IST

नवलेंचा जामीन अर्ज फेटाळला; अटक अटळ!

पुण्यातील सिंहगड इन्स्टीट्यूटचे मालक मारूती नवले यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टानं फेटाळलाय. त्यामुळे त्यांची अटक अटळ असल्याचं दिसतंय.

Sep 7, 2012, 01:59 PM IST