सुप्रीम कोर्ट

मराठा-मुस्लिम आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचीही स्थगिती

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका बसलाय. मराठा, मुस्लिम आरक्षण नाकारले सुप्रीम कोर्टानं नाकारले आहेत. हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला असून हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय.

Dec 18, 2014, 12:31 PM IST

निवडा BCCI की CSK सुप्रीम कोर्टाचे श्रीनिवासन यांच्यासमोर पर्याय

आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टानं एन. श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा दणका देत चेन्नई सुपर किंग्जची मालकी किंवा बीसीसीआयचं अध्यक्षपद यापैकी एक पर्याय निवडण्यास सांगितलं आहे. तसंच गुरुनाथ मयप्पन यांच्यावरही तातडीनं कारवाई करावी असे निर्देशही कोर्टानं बीसीसीआयला दिले आहेत. 

Dec 9, 2014, 06:26 PM IST

मुंबईतील हुक्का पार्लरवरील बंदी सुप्रीम कोर्टानं उठवली

मुंबईतील हुक्का पार्लरवर मुंबई महापालिकेनं टाकलेली बंदी सुप्रीम कोर्टानं हटवली आहे.  धुम्रपानावर बंदी नसेल तर हुक्का पार्लरवर बंदी कशाला हवी, असा सवालही सुप्रीम कोर्टानं उपस्थित केला आहे. 

Dec 8, 2014, 06:28 PM IST

स्पॉट फिक्सिंगमुळं क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात - सुप्रीम कोर्ट

क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ असून तो खेळाडू वृत्तीनंच खेळला गेला पाहिजे, पण तुम्ही फिक्सिंगसारख्या प्रकारांना पाठिशी घालून क्रिकेटलाच संपवत आहात अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयची कानउघडणी केली आहे. 

Nov 24, 2014, 04:14 PM IST

टूजी घोटाळा : सीबीआय अध्यक्षांची हकालपट्टी!

सीबीआयचे डायरेक्टर रणजीत सिन्हा यांना आज फार मोठा दणका मिळाला. सिन्हा यांनी टूजी घोटाळ्याच्या चौकशीतून दूर व्हावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Nov 20, 2014, 08:49 PM IST

आता, बॉलिवूडमध्येही दिसणार महिला मेकअप आर्टिस्ट

आता, बॉलिवूड इंडस्ट्रीत महिला मेकअप कलाकार आणि हेअरड्रेसर्सही दिसणार आहेत. कारण, सुप्रीम कोर्टानं सोमवारी, महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव करणारं या इंडस्ट्रीतल्या संघटनांचं ‘ते’ नियमच रद्दबादल ठरवले आहेत. 

Nov 11, 2014, 11:06 AM IST

सावधान! इतरांचं घर अडवून बसाल तर...

भाडेकरू आणि घरमालक असा वाद आपण नेहमीच ऐकतो. पण हेकेखोरपणानं घर खाली न करून अंधेरी (पू.) इथल्या एका मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीची योजना गेली पाच वर्षे रखडवून ठेवणाऱ्या दोन भाडेकरूंना अटक करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय.

Nov 4, 2014, 10:09 AM IST

वेश्याव्यवसायाला कायदेशीर करण्याची शिफारस करणार महिला आयोग

राष्ट्रीय महिला आयोग वेश्याव्यवसायाला कायदेशीर करण्याची शिफारस करण्याची शक्यता आहे. कारण महिला आयोगाच्या प्रमुख्य ललिता कुमारमंगलम देशातील सेक्स वर्कर्सचं आयुष्य सुसह्य बनविण्यासाठी प्रयत्न करतायेत. महिला आयोग याप्रकरणी हायकोर्टाद्वारे बनवण्यात आलेल्या समितीसमोर ८ नोव्हेंबरला आपल्या शिफारशी ठेवणार आहेत.  

Nov 1, 2014, 09:22 AM IST

काळा पैसा: २७ जणांविरोधात पुढील महिन्यात कारवाई होणार?

सर्वोच्च न्यायालयात काल केंद्र सरकारनं काळ्यापैशासंदर्भात ६२७ खात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी ६१५ खाती ही खासगी असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या खातेदारांपैकी २८९ जणांच्या खात्यात सध्या झिरो बॅलन्स आहे. 

Oct 30, 2014, 07:02 PM IST

काळा पैसा : काय दडलंय त्या बंद पाकिटात?

परदेशी बँकांमध्ये काळा पैसा ठेवलेल्या ६२७ भारतीयांची यादी केंद्र सरकारनं आज सुप्रीम कोर्टाला सादर केली. तीन बंद लिफाफ्यांमध्ये ही यादी कोर्टाला देण्यात आलीय.

Oct 29, 2014, 03:21 PM IST