bangladesh

बांग्लादेश दौरा : भारतीय टीममध्ये नविन चेहऱ्यांना संधी

टीम इंडियाचा पुढील महिन्यात बांग्लादेश दौरा असणार आहे. ७ जूनला भारतीय टीम बांग्लादेशला रवाना होणार आहे. मात्र, या दौऱ्यात नविन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

May 6, 2015, 01:07 PM IST

जूनमध्ये टीम इंडिया बांग्लादेश दौऱ्यावर!

भारतीय क्रिकेट टीम एक टेस्ट आणि तीन वनडे आंतरराष्ट्रीय मॅचसाठी पुढच्या महिन्यात बांग्लादेशचा दौरा करणार आहे. 

May 5, 2015, 05:32 PM IST

जगात भारतापेक्षा बांग्लादेश, पाकमधील लोक अधिक सुखी

 प्रत्येक जण सुखी व्हावं ही उदात्त भावना अख्ख्या जगासाठी भारतीय ऋषींनी आणि संतांनी बोलून दाखवली आहे. मात्र स्वतः भारतीय हा महान संदेश आचरणात आणण्यात अपयशी ठरल्याचं, नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पाहणीत आढळून आलंय.

Apr 26, 2015, 10:10 AM IST

बांग्लादेशने १६ वर्षांनंतर पाकिस्तानला चारली धूळ, ७९ रन्सने विजय

सलामी फलंदाज तमीम इक्बाल आणि विकेटकिकपर फलंदाज मुशफिकर रहीम यांच्या शतकांच्या जोरावर बांग्लादेशने पाकिस्तान विरोधात पहिल्या वनडेमध्ये सहा विकेट ३२९ धावांचा डोंगर उभा केला.

Apr 18, 2015, 09:01 AM IST

वन डे पाक विरूद्ध बांगलादेशचा विशाल स्कोअर

 सलामीवीर फलंदाज तमीम इकबाल आणि विकेटकीपर फलंदाज मुशफिकर रहीमच्या शानदार शतकांच्या जोरावर बांगलादेशने पाकिस्तानविरूद्धच्या सिरीजमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये सहा विकेट गमावून ३२९ धावांचा डोंगर उभारला. 

Apr 17, 2015, 08:20 PM IST

ड्रायव्हरशिवाय ट्रेन उलटी २६ किलोमीटर धावली

बांग्लादेशमध्ये आज एक आगळी वेगळी घटना घडलीय. एक ट्रेन कोणत्याही ड्रायव्हर किंवा गार्डशिवाय मागच्या बाजुला चालत गेली... 

Apr 12, 2015, 09:14 PM IST

भारतीय नौसेनेनं केली ४३९ भारतीय नागरिकांची येमेनमधून सुटका

येमेन मध्ये सौदी अरेबियानं हल्ले सुरुच ठेवले असून भारतीय नौदलाच्या एका जहाजानं येमेन मधून ४३९ भारतीयांची सुखरुप सुटका केलीये. यात केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्रीयन, बंगाल आणि दिल्लीतील नागरीकांचा समावेश आहे.

Apr 5, 2015, 03:07 PM IST

बांगलादेश जिंकणार पुढचा वर्ल्ड कप!

बांगलादेशची टीम यंदाच्या वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे, मात्र पुढचा वर्ल्ड कप बांगलादेशच जिंकणार असल्याची भविष्यावाणी बांगलादेशचे खेळ मंत्री बिरेन सिंकदर यांनी केली आहे. 

Mar 23, 2015, 05:14 PM IST

बांग्लादेश कर्णधार मशरेफी मुर्तजावर निलंबनाची कारवाई

बांग्लादेशचा कर्णधार मशरेफी मुर्तजाला वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये धीम्या गतीने गोलंदाजी केल्याबद्दल  एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच सामन्याच्या एकूण मानधनाच्या ५० टक्के दंड आकारण्यात येणार आहे.

Mar 20, 2015, 02:33 PM IST

वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत - आयसीसी अध्यक्ष

टीम इंडिया खेळाडू रोहित शर्मा याच्या 'नोबॉल'चा मुद्दा आयसीसीकडे नेणार असल्याचे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. वर्ल्डकप जिंकण्यासाठी भारताला मदत करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष एएचएम मुस्तफा कमाल यांनीही याला समर्थन दिलेय. पंचांची कामगिरी खराब असल्याचे त्यांनी म्हटलेय.

Mar 20, 2015, 12:13 PM IST

विराटची विकेट घेतल्यानंतर गेला रुबेलचा तोल!

 भारताचा धुरंधर क्रिकेटर क्रिकेटर विराट कोहली आज बांग्लादेशविरुद्धच्या क्वार्टर फायनल मॅचमध्ये केवळ तीन रन्सवर आऊट झाला. विराटला आऊट केल्यानंतर बांग्लादेशी बॉलर रुबेल हुसैन यानं मात्र जोशमध्ये येऊन खुन्नसमध्ये विराटसाठी अपशब्द वापरले. त्यामुळे, एक नवा वाद उभा राहिलाय. 

Mar 19, 2015, 02:16 PM IST

आज भारत-बांग्लादेश मॅचनंतर हे रेकॉर्ड्स!

मेलबर्न क्रिकेट मैदानात आज सुरू असलेल्या भारत-बांग्लादेश क्वॉर्टर फायनल मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी 'करो या मरो'ची स्थिती आहे. पण यादरम्यान आज अनेक रेकॉर्ड्स पण होऊ शकतात.

Mar 19, 2015, 12:49 PM IST

स्कोअरकार्ड: भारत Vs बांग्लादेश (दुसरी क्वॉर्टर फायनल)

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरी  क्वार्टर फाइनल होत आहे. भारतासाठी ही लढत सोपी वाटत असली तरी सोपी नाही. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे. 

Mar 19, 2015, 08:17 AM IST

भारत-बांगलादेश सामन्यात 'बॉम्बे वेलवेट'

भारत-बांगलादेश सामन्यात 'बॉम्बे वेलवेट'चा तडका पाहायला मिळणार आहे. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर भारत-बांग्लादेश सामन्यादरम्यान रिलीज करण्यात येणार आहे. कारण भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ मार्च रोजी हा सामना रंगणार आहे. उपांत्यपूर्व सामन्यात रणबीर कपूर स्वत: हा ट्रेलर लॉन्च करणार आहे.

Mar 18, 2015, 09:08 PM IST