congress

राष्ट्रवादीचा काँग्रेसला `संदेश`!

राष्ट्रवादीचे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संदेश पारकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

Jan 2, 2013, 09:34 PM IST

काँग्रेसच्या रजनी पाटील बिनविरोध

विलासराव देशमुख यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेसाठी पाटील यांच्या नावाची काल काँग्रेसनं घोषणा केली होती. रजनी पाटील या बीडच्या माजी खासदार असून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत.

Jan 2, 2013, 05:37 PM IST

अमेरिकेत धनाढ्य लोकांना वाढीव कर

बलाढ्य अमेरिकेला आर्थिक संकटात लोटण्याची भीती असणारं फिस्कल क्लिफ संकट टाळण्यात बराक ओबामा प्रशासनाला यश आलंय. मात्र यामुळे अमेरिकेतल्या धनाढ्य लोकांना वाढीव कर भारावा लागणार आहे.

Jan 2, 2013, 03:52 PM IST

पवारांवर काँग्रेसचा प्रतिहल्ला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वबळाच्या भाषेला काँग्रेसनंही आक्रमक उत्तर दिलंय. स्वबळावर लढून राष्ट्रवादीला विरोधात बसायचे आहे का असा खोचक सवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Jan 1, 2013, 09:18 PM IST

काँग्रेसच्या दगाफटक्यावर शरद पवार नाराज

काँग्रेसने गुजरातमध्ये केलेल्या दगाफटक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असून 2014 साली होणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.

Dec 31, 2012, 08:29 PM IST

`म्हणून काय रात्रभर महिलांनी रस्त्यावर फिरायचे?`

आपल्या देशाला स्वातंत्र्य मध्यरात्री मिळाले. याचा अर्थ घेवून महिलांनी रात्रभर रस्त्यावर भटकायचे काय, असा सवाल केला आहे आंध्रप्रदेशमधील काँग्रेसचे परिवनह मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी.

Dec 25, 2012, 12:59 PM IST

सोनिया गांधी यांनी धरले खासदाराचे मानगुट!

लोकसभेत बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी झालेल्या धक्काबुक्की अधिकच गोंधळात भर पडली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चक्क समाजवादी पार्टीच्या खासदार यशवीर सिंग यांचे मानगुट पकडले.

Dec 20, 2012, 03:56 PM IST

नरेंद्र मोदीच गुजरातच्या गादीवर

गुजरातमधील जनतेने मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मोदी सलग तिसऱ्यांदा गुजरातच्या गादीवर बसण्यास मोकळे झाले आहेत. मणिनगरमधून मोदींनी तर त्यांचे समर्थक नारणपुरामधून अमित शहा विजयी झाले आहेत. गुजरातमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्ता आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

Dec 20, 2012, 11:35 AM IST

गुजरातच्या विक्रमी मतदानामुळे मोदी चिंतीत

सोमवारी गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पूर्ण झालं. २० डिसेंबरला लागणाऱ्या निकालाची सगळे आता वाट पाहात आहेत. गुजरातमध्ये यंदा झालेल्या विक्रमी मतदानामुळे सर्व पक्षांनी विचारमंथन सुरू केलं आहे.

Dec 19, 2012, 05:24 PM IST

मोदी सरकारवर आरोपांचा भडिमार

गुजरात विधानसभा निवडणुकीचा भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यात विविध आश्वासनं देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. तर काँग्रेसनं मोदींविरोधात आरोपपत्र प्रसिद्ध करत त्यांना आरोपीच्या पिंज-यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय.

Dec 3, 2012, 06:50 PM IST

राहुल नाही, चिदम्बरम पंतप्रधानपदाचे उमेदवार?

आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसकडून राहूल गांधींना नव्हे, तर पी. चिदम्बरम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ‘द इकोनॉमिस्ट’ वृत्तपत्राने ही शक्यता वर्तवली आहे.

Dec 2, 2012, 04:20 PM IST

नाशिकमध्ये सत्ताधारींविरोधात शिवसेना-मनसेचा एल्गार

नाशिकच्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विकास निधीवरून चांगलच राजकारण पेटलंय. तीन महिने पाठपुरावा करूनही सत्ताधारी ताकास तूर लागू देत नसल्यानं संतापलेल्या विरोधकांनी तीन दिवसांपासून विविध माध्यमातून आंदोलन चालू ठेवलं.

Dec 1, 2012, 06:42 PM IST

काँग्रेस, मनसेवाल्यांचं डोकं फिरलं आहे- आठवले

काँग्रेसच्या नयना सेठ आणि मनसेचे संदीप देशपांडेंचं डोकं फिरलं असून त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी इंदू मिलच्या स्मारकाप्रकरणी व्यक्त केलीए.

Nov 23, 2012, 04:38 PM IST

काँग्रेसवाले कसाबला मांडीवर घेऊन क्रिकेट पाहतील – बाळासाहेब

हे काँग्रेसचे मंत्री कसाब आणि अफजलगुरुला मांडीवर घेऊन क्रिकेटचे सामने पाहतील, इतका निर्लज्जपणा यांच्या अंगात भिनलेला आहे, अशी तोफ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट मालिकेवरुन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर डागली.

Nov 13, 2012, 08:16 PM IST

नाहीतर.. राणे माझ्याकडे घरगडी व्हा- रामदास कदम

शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील द्वंद्व साऱ्यांनाच परिचयाच आहे. यावेळेस रामदास कदम आणि नारायण राणे यांच्यात वाद उद्भवला आहे.

Nov 13, 2012, 11:09 AM IST