काँग्रेस- तृणमूलमध्ये राडा; पोलिसाचा मृत्यू
काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. कोलकतामध्ये महाविद्यालयीन निवडणुकीदरम्यान वाद उफाळून आला. या वादात एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला तर चार विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.
Feb 12, 2013, 02:52 PM ISTबेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कृपाशंकर सिंहांच्या अडचणीत भर
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत भर पडली आहे. एसआयटीनं याबाबतचा अंतिम अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला आहे.
Feb 4, 2013, 07:24 PM ISTकाँग्रेस सरकारला छगन भुजबळांचा घरचा आहेर
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकमेकांना आपले शत्रू मानतात पण आपल्यासमोर खरे शत्रू शिवसेना-भाजप आणि मनसे आहे हे विसरुन चालणार नाही, नाहीतर विपरीत घडेल, असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय.
Feb 3, 2013, 07:24 PM ISTमुख्यमंत्र्यांचं विधान चुकीचं - अजित पवार
मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याची जोरदार टीका करत अजित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे. राज्य बँकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतरच लायसन्स मिळालं, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. याचा समाचार घेताना, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना खोटं ठरवलं.
Jan 27, 2013, 07:19 PM ISTमेट्रो स्टेशन की शिवसृष्टी, काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली
काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मेट्रो स्टेशनच्या जागेबाबत घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पासमोर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. ज्या ठिकाणाहून मेट्रो सुटणार आहे त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन करायचे की शिवसृष्टी यावरुन या दोन्ही पक्षात जुंपलीय.
Jan 23, 2013, 06:54 PM IST`शिंदे चुकून म्हणाले हिंदू दहशतवादी`, काँग्रेसची सारवासारव
सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस आता बॅकफूटवर आलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद असं चुकून म्हटलं असेल, अशी सारवासारव काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी केली आहे.
Jan 22, 2013, 08:02 PM ISTराहुल गांधींची निवड लोकशाहीला हानीकारक - मेधा पाटकर
राहुल गांधी यांची उपाध्यक्षपदी निवड करुन काँग्रेसनं घराणेशाही जोपासल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केलाय. एकाच घरात सर्व पदं असणं हे लोकशाहीला हानीकारक असल्याचं पाटकर यांनी म्हटलं.
Jan 21, 2013, 08:50 AM ISTशिंदेंची कोलांटीउडी, म्हणे मी `हिंदू` म्हटलंच नव्हतं!
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या विधानावर चक्क कोलांटउडी मारली आहे. एआयसीसी बैठकीतल्या भाषणात बोलताना त्यांनी `हिंदू` हा शब्द स्पष्टपणे वापरला होता. मात्र नंतर पत्रकारांशी बोलताना आपण `सॅफ्रॉन` म्हणालो, ‘हिंदू’ म्हणालोच नाही असं सांगत घूमजाव केलं.
Jan 20, 2013, 04:31 PM ISTभाजपचे कॅम्प हिंदू दहशतवाद्यांसाठी - सुशीलकुमार शिंदे
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालविण्यात येणारे कॅम्प हे हिंदू दहशतवाद्यांसाठीच असल्याचे, वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे केले. दरम्यान, काँग्रेसने माफी मागावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा हल्ला भाजपने चढविला आहे.
Jan 20, 2013, 03:10 PM ISTदेशात पुन्हा काँग्रेस सत्तेत - सोनिया गांधी
आगामी लोकसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढविली जाणार आहे. या निवडणुकीचा मुख्य मुद्दा विकास असेल. त्यामुळे २०१४ मध्ये देशात पुन्हा काँग्रेसचे सरकार असेल, असा विश्वास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे व्यक्त केला.
Jan 20, 2013, 01:15 PM ISTराहुल गांधी झाले काँग्रेसचे उपाध्यक्ष
काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर आता पक्षात नवी जबाबदारी सोपवण्यात आली. राहुल गांधी पक्षाचे नवे उपाध्यक्ष असतील.
Jan 19, 2013, 11:31 PM ISTही आत्मचिंतनाची वेळ - सोनिया गांधी
जयपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. काँग्रेससाठी ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.
Jan 18, 2013, 04:06 PM ISTकाँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये हाणामारी
नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सदस्यांनी चक्क एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या. शिवसेनेच्या महिला सदस्याचे निलंबन केल्यामुळं हा गोंधळ घालण्यात आला.
Jan 16, 2013, 09:51 PM ISTराज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे- गिरीराज सिंग
परप्रांतीयच जबाबदार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र राज ठाकरेंच्या या विधानावरून बिहारच्या नेत्यांनी राज ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलं आहे.
Jan 6, 2013, 03:52 PM ISTबलात्कार करणाऱ्या काँग्रेसी नेत्याची बेदम धुलाई
आसामच्या चिरांग भागात विक्रम सिंग ब्रह्म या काँग्रेसच्या नेत्याची स्थानिकांनी बेदम धुलाई केली. या नेत्याला लोकांनी लाथा-बुक्क्यांनीच नव्हे, तर चपला, बुटांनीही मारलं. जी वस्तू हाताला लागेल, ती घेऊन या नेत्यांची लोकांनी धुलाई केली. काँग्रेस नेता मदतीसाठी ओरडत राहीला. मात्र लोक त्याला बदडतच राहीले.
Jan 3, 2013, 05:13 PM IST