दाऊदच्या मुसक्या बांधणार - गुहमंत्री सुशीलकुमार शिंदे
अफजल गुरु आणि कसाबनंतर आता दाऊदला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलंय. दाऊदचा पत्ता हाती लागला असून त्याल मुसक्या बांधण्यासाठी अमेरेकेच्या FBIची मदत घेतली जात असल्याचंही शिंदेंनी सांगितलंय.
Jan 8, 2014, 11:01 PM ISTवा कपिल पाजी! कपिल देवनं हाकललं दाऊदला!
पाकिस्तानच्या टीमला पराभूत केल्यास भारताच्या टीममधील प्रत्येक क्रिकेटरला टोयोटा करोला गाडी गिफ्ट देण्याची ऑफर दाऊद इब्राहिमनं दिली होती, असा खुलासा भारताचा माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी केलाय.
Oct 28, 2013, 02:00 PM ISTदाऊद पाकिस्तानात, भारतात आणणार - गृहमंत्री शिंदे
अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३मधील मुंबई साखळी स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याला कोणत्याही परिस्थिती भारतात आणले जाईल. त्याला पकडण्यासाठी अमेरिकेबरोबर मोहीम राबविणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सांगितले.
Sep 9, 2013, 02:43 PM ISTदाऊद काय? एक-एक करून सर्वांना आणणार - शिंदे
भारताचा मोस्ट वॉन्टेंड गुन्हेगार अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहीम याला भारतात आणून त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Sep 2, 2013, 07:18 PM ISTदहशतवादी आणि नेपाळ
काही दिवसांपूर्वी दहशतवादी अब्दुल करीम टुंडा आणि आता यासीन भटकळ या दोघांना पोलिसांनी अटक केलीय...विशेष म्हणजे या दोघांनाही भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आलीय..दहशतवादी आणि नेपाळ यांचं काय नातं आहे त्याचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
Aug 30, 2013, 08:35 AM ISTदहशतवादी टुंडाला न्यायालय परिसरात थोबाडले
भारतात दहशत पसरवणारा पाकिस्तानी जहाल अतिरेकी अब्दुल करीम टुंडा याचे हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी पटियाला हाऊस न्यायालयाच्या परिसरात थोबाडच फोडले. भारतीय तुरुंगातून सुटका होताच आपण पुन्हा दहशतवादी हल्ले करणार असे सांगत टुंडाने नुकतेच भारताला आव्हान दिले होते.
Aug 21, 2013, 09:29 AM IST‘... तर मोदी दाऊदला खेचून आणतील’- उद्धव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळलीय. ‘सामना’तल्या संपादकीयमधून त्यांनी मोदींची स्तुती केलीय. “जर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर ते माफिया डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणतील आणि त्याला फाशीवर लटकवतील”, असा शिवसेनेला वाटतं.
Aug 18, 2013, 01:01 PM ISTमोस्ट वॉटेंड दाऊद पाकिस्तानात, पाकचीच कबुली
दाऊद इब्राहिमबाबत पाकिस्तानचं पितळ उघड झालं आहे. दाऊद पाकिस्तानातच होता, मात्र आता सौदी अरेबियात (युएईमध्ये) पळाला असावा, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विशेष दूत शहरयार खान यांनी दिली आहे.
Aug 10, 2013, 07:00 AM ISTडॉन दाऊदच्या तीन ठिकाणांची माहिती
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मंगळवारी ६००० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. यातमध्ये कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम यांच्या कारनाम्याची तीन ठिकाणे नमुद करण्यात आली आहेत. तर दोन वेळा त्यांने बुकींशी संपर्क केल्याचे स्पष्ट म्हटलं आहे. दोनदा तसे रेकॉर्ड करण्यात आल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे.
Jul 31, 2013, 11:45 AM ISTऋषी कपूर `दाऊद इब्राहिम`च्या भूमिकेत?
“ट्रिगर खींच, मामला मत खींच” असा डायलॉग मारणारा ऋषी कपूर ‘डी डे’ सिनेमाच्या प्रोमोमध्ये दिसल्यावरच ऋषी कपूर दाऊदची भूमिका साकारत असल्याचं लक्षात आलं.
Jul 11, 2013, 05:36 PM ISTस्पॉट फिक्सिंगः दाऊद आणि छोटा शकीलचा हात
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम आणि छोटा शकील यांचा हात असल्याची माहिती दिल्ली पोलिसातील सूत्रांनी दिली आहे.
Jun 4, 2013, 07:13 PM ISTसट्टेबाजीतील कमाई `हरामा`ची, आम्ही ते करत नाही- छोटा शकील
IPL च्या स्पॉट फिक्सिंगमध्ये डी कंपनीचं नाव सध्या गाजत आहे. स्पॉट फिक्सिंगचं दुबई कनेक्शन दाऊद इब्राहिमशी जाऊन मिळत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दाऊदचा स्पॉट फिक्सिंगशी कुठलाही संबंध नसल्याचं दाऊद इब्राहमचा उजवा हात असणाऱ्या छोटा शकीलने म्हटलं आहे.
May 23, 2013, 03:51 PM ISTवेदनेची २० वर्षे
साखळी बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरुन गेला होता...मुंबई रक्ताने न्हावून निघाली होती...हे का घडलं ? कोणी घडवून आणलं ? असा प्रश्न त्यावेळी मुंबईकरांना प़डला होता..पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा या भीषण बॉम्बस्फोटा मागच्या सूत्रधाराचा चेहरा समोर आला...
Mar 12, 2013, 11:40 PM ISTनितीन गडकरींना भाजपचा ठाम पाठिंबा
भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर भाजप नितीन गडकरींच्या पाठिशी ठाम राहिला आहे. स्वामी विवेकानंद आणि कुख्यात डॉन दाऊद यांची तुलना केल्याने गडकरींवर जोरदार टीका झाली. याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेते राम जेठमलानी यांनी राजीनाम्याची मागणी गेली. मात्र, गडकरींवरील सर्व आरोप चुकीचे आहेत, अशी भूमिका घेत भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत गडकरींना पाठिंबा देण्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.
Nov 7, 2012, 04:10 PM ISTविवेकानंद आणि दाऊदचा आयक्यू समान - गडकरी
पूर्ती कंपनीच्या गुंतवणूकदारांवरुन झालेल्या आरोपांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच नितीन ग़डकरी यांच्यावर आणखी एक वाद ओढावलाय. भोपाळमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा आयक्यू समान असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलयं.
Nov 5, 2012, 12:26 PM IST