entertainment news

सेलिब्रिटींचं करिअर संपवण्याच्या आरोपावर Salman Khanने अखेर मौन सोडलं, म्हणाला 'मी दारू पिऊन...'

Salman Khan On destroying stars career : कलाकारांच करिअर संपवण्याच्या त्याच्यावर असलेल्साय आरोपावर सलमाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर त्यानं वडील होण्याच्या त्याच्या इच्छेपासून अनेक गोष्टींवर मोकळेपणानं सांगितले आहे.

May 1, 2023, 02:32 PM IST

Choreographer Chaitanya Suicide : प्रसिद्ध कोरिओग्राफरने उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक कारण आलं समोर

Choreographer Chaitanya Suicide : या लोकप्रिय डान्स कोरिओग्राफरनं स्वत: ला संपवण्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत त्याचं आत्महत्या करण्याचं कारण हे त्याच्यावर असलेलं कर्ज आहे, त्यानं तो खूप त्रस्त झाला असून त्यानं असा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. 

May 1, 2023, 01:28 PM IST

"हे येड्या गबाळ्याचं काम नाही", मराठी भाषेवर Pravin Tarde चं वक्तव्य, म्हणाले 'इंग्रजीत शिवी दिली तर...'

Pravin Tarde On Marathi Language : प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी भाषेवर वक्तव्य केलं आहे. मराठी भाषा ही भावनिक नाही तर जहरी आहे असं प्रवीण तरडे म्हणाले. दरम्यान, प्रवीण तरडे सध्या त्यांचा 'बलोच' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 

May 1, 2023, 12:34 PM IST

प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान च्या कॉन्सर्टवर पुणे पोलिसांची कारवाई! नेमकं काय घडलं? जाणून घ्या..

A R Rahman Live Concert Pune: A R Rahman चा नुकताच पुण्यात कॉन्सर्ट होता. त्यावेळी हजोरांच्या संख्येनं प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. त्या दरम्यान, सगळे कॉन्सर्टचा आनंद घेत असताना अचानक पुणे पोलिसातील कर्मचाऱ्यांनं स्टेजवर जात ए आर रहमानला शो बंद करण्यास सांगितले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

May 1, 2023, 11:40 AM IST

The Kerala Story चित्रपटावरून टीका करणाऱ्यांना अदा शर्माचं सडेतोड उत्तर, म्हणाली 'हा चित्रपट कोणत्याही...'

The Kerala Story : 'द केरला स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर याविषयीच चर्चा सुरु झाली आहे. अनेक लोक या चित्रपटावरून कलाकारांना, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना हा चित्रपट केल्यामुळे ट्रोल करत आहेत. तर सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर अदा शर्मानं सडेतोड उत्तर दिलं आहे.

Apr 30, 2023, 07:14 PM IST

Aishwarya ला चित्रपटांमध्ये काम करु दे, तू आराध्याला सांभाळ; म्हणणाऱ्याला Abhishek Bachchan ने दिलं चोख उत्तर, म्हणाला...

Abhishek Bachchan and Aishwarya Rai : ऐश्वर्या रायचा नुकताच ‘पोन्नियिन सेल्वन 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 2023 या वर्षात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ऐश्वर्याचा हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Apr 30, 2023, 04:38 PM IST

सेटवर महिलांच्या कपड्यांवर असलेल्या नियमावर Salman Khan नं सोडलं मौन, म्हणाला...

Salman Khan नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महिलांसाठी त्याच्या सेटवर असलेल्या नियमांविषयी वक्तव्य केलं आहे. त्यावेळी महिलांसाठी असे नियम असण्यासाठी पुरुष जबाबदार आहेत असे देखील सलमान खाननं सांगितलं. सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला.

Apr 30, 2023, 03:10 PM IST

Naagin 6: हिंदी बोलता येत नाही आणि...; मित्रांनीच उडवली होती अभिनेत्रीची खिल्ली

अभिनेत्री Mahekk Chahal नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला हिंदी येत नव्हती म्हणून तिचे मित्र- मैत्रिणी कशी खिल्ली उडवायचे या विषयी सांगितले आहे. तर महक चहलनं नागिन या मालिकेच्या 6 व्या सीझनमध्ये काम केलं आहे. महक चहल ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. 

Apr 30, 2023, 02:22 PM IST

लग्न नाही तर Salman Khan नं केलं होतं बाळाचं प्लॅनिग! अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला "काही वर्षांपूर्वी..."

Salman Khan : सलमान खाननं काही वर्षांपूर्वी वडील होण्याचा निर्णय घेतला होता याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. तर याशिवाय सलमाननं या मुलाखतीत त्याच्या लग्नाविषयी आणि रिलेशनशिपविषयी देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Apr 30, 2023, 01:42 PM IST

...अन् संतापाच्या भरात Sharad Kelkar ने हाताने फोडली काच, पडले होते 150 टाके

Sharad Kelkar : शरद केळकर हा लोकप्रिय मराठमोळा अभिनेता आहे. त्यानं आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. इतकंच काय तर शरदनं अनेक गाजलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांसाठी डबिंग केली आहे. शदरनं फक्त अभिनय क्षेत्रात नाही तर डबिंगच्या क्षेत्रातही त्याचं नाव कमावलं आहे. 

Apr 30, 2023, 12:48 PM IST

किंग्स चार्ल्स III यांच्या क्राउन सेरेमनीमध्ये Sonam Kapoor लावणार हजेरी!

Sonam Kapoor and King Charles III : सोनम कपूर ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत होती. तर आता सोनमचं चर्चेत असण्याचं कारण हे किंग चार्ल्स थर्ड आहेत. किंग चार्ल्स थर्ड यांच्या क्राउन सेरेमनी कार्यक्रमात हजेरी लावणारी सोनम ही एकमेव भारतीय असणार आहे. 

Apr 30, 2023, 11:24 AM IST

...मेरा महबूब आया है! शेतात गोड आवाजात गाणं गाणाऱ्या आजीबाईंचा Video Viral

Viral Video : सोशल मीडियामुळे अनेक छुप्या कलाकारांचे टॅलेंट जगासमोर आल्यानंतर त्यांचे जीवन बदललं आहे. सोशल मीडियावर सध्या अशाच एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ही आजी शेतात काम करताना गाणे गुणगुणत आहे.

Apr 29, 2023, 06:48 PM IST

'बाथरुममध्ये लपूनछपून जेवायची कारण...', अमेरिकेत Priyanka Chopra वर आली होती अशी वेळ

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं आहे. प्रियांकाला आज फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूड अभिनेत्री म्हणून देखील ओळखली जाते. पण तिथ पर्यंत पोहोचायला प्रियांकानं प्रचंड मेहनत केली आहे. प्रियांकानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती जेव्हा अमेरिकत शिक्षण करण्यासाठी आली होती. तेव्हा तिच्यासाठी हे सगळं इतकं सोपं नव्हतं असं तिनं सांगितलं होतं. प्रियांकाना यावेळी सांगितलं की तिला सगळ्यांची इतकी भीती वाटायची की ती बाथरुममध्ये जाऊन दुपारचं जेवण करायची. 

Apr 29, 2023, 06:41 PM IST

'घरातल्याच माणसावर बायोपिक...', Maharashtra Shahir वर बोलताना प्रवीण तरडे असं का बोलले?

Pravin Tarde On Maharashtra Shahir Movie : महाराष्ट्र शाहिर हा चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना महाराष्ट्र शाहीर म्हणजेच शाहीर साबळे यांच्या आयुष्य पाहता येणार आहे. तर अंकुश चौधरी हा या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. 

Apr 29, 2023, 06:15 PM IST

Arjun Rampal च्या गर्लफ्रेंडनं दिली गूड न्यूज! वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेता चौथ्यांदा होणार बाबा

Arjun Rampal Girlfriend Gabriella Demetriades Pregnant : अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडनं ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. गॅब्रिएलानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Apr 29, 2023, 05:17 PM IST