fifa world cup

आज महाराष्ट्र होणार फुटबॉलमय...

पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज दहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.

Sep 15, 2017, 09:53 AM IST

फिफा वर्ल्ड कपसाठी नवी मुंबई सज्ज

फिफा अंडर १७ वर्ल्डकपसाठी नवी मुंबई सज्ज झाली आहे. फिफाचे पाच सामने नेरुळ येथील डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत.

Aug 8, 2017, 08:32 PM IST

फीफा वर्ल्ड कप : नवी मुंबईतील ४ कोटी खर्च करुन केलेले मैदान सिडको तोडणार

नवी मुंबईत फीफा वर्ल्ड कप होणार आहे , या सामन्याच्या सरावासाठी नवी मुंबईतील स्पोर्ट्स क्लबमध्ये ४ कोटी खर्च करून मैदान बनवण्यात आले आहे.

Aug 5, 2017, 03:51 PM IST

ब्राझिलच्या पराभवामुळं अल्पवयीन मुलीची आत्महत्या

फुटबॉल वर्ल्डकप मॅच आपल्या अखेरच्या टप्प्यात आलेला आहे. यजमान ब्राझील टीमचा सेमिफायनलमधील पराभव अनेकांच्या जिव्हारी लागलाय. नेपाळमधील एका अल्पवयीन मुलीनं ब्राझिलच्या पराभवाचा धसका घेत चक्क आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

Jul 10, 2014, 03:56 PM IST

‘मॅजिकल मेसी’ची टीम 24 वर्षांनी वर्ल्डकप फायनलमध्ये

अर्जेन्टीनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये बाजी मारत वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. 

Jul 10, 2014, 07:59 AM IST

नेमार शिवाय ब्राझील उतरणार आज मैदानात

ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. स्टार स्ट्रायकर नेमार आणि कॅप्टन थियागो सिल्वा या मॅचमध्ये खेळणार नसल्यानं ब्राझीलसमोर जर्मनची अभेद्य भिंत भेदण्याचं आव्हान असेल. तर तब्बल 13व्यांदा सेमी फायनल गाठलेली जर्मन यजमानांना पराभवाचा धक्का देण्यासाठी सज्ज असेल.

Jul 8, 2014, 03:28 PM IST

फिफा वर्ल्ड कप - जर्मनी, ब्राझील विजयी तर कोलंबिया, फ्रान्स पराभूत

 फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने फ्रान्सला १-० ने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. जर्मनीने वर्ल्ड कपमध्ये १३वेळा सेमी फायनल गाठलीय. पहिल्या हाफमध्ये १३व्या मिनिटाला मॅट्स हुमेल्सने गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिलीय. फ्रान्स संपूर्ण मॅचमध्ये एकही गोल करता आला नाही. 

Jul 5, 2014, 07:30 AM IST

ब्राझील-चिली मॅचने तोडले ट्विटरचे सर्व रेकॉर्ड

पाच वेळेचा विश्व विजेता ब्राझीलने विश्व चषकात चिलीला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून टॉप १६ मध्ये जागा मिळविली. या सामन्याने ट्विटरचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे. 

Jul 1, 2014, 01:32 PM IST

ब्राझीलच्या फॅनने आनंदात टीव्ही फोडला, व्हिडिओ व्हायरल

 ब्राझीलचा एका फुटबॉल वेडा आपल्या टीमचा वर्ल्ड कप सामन्यातील पेनल्टी शूट आऊट वेळी तणाव सहन करू शकला नाही. अति उत्साहात त्याने आपला टीव्हीचा स्क्रिनच फोडला.  

Jun 30, 2014, 08:17 PM IST

सुआरेजनं माझ्या खांद्याचा चावा घेतला - चिलिनी

इटलीचा डिफेंडर जार्जियो चिलिनीनं म्हटलं, की  उरुग्वेचा स्ट्राइकर लुई सुआरेजनं वर्ल्डकप ग्रुप डी मॅच दरम्यान त्याच्या खांद्याचा चावा घेतला होता.    

 

Jun 25, 2014, 12:57 PM IST

फिफा 2014 : इटली - उरुग्वेमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत

'ग्रुप ऑफ डेथ' मध्ये आज इटली आणि उरुग्वे या माजी वर्ल्ड चॅम्पियन इटली आणि उरुग्वेमध्ये लढत रंगणार आहे. नॉक आऊटमध्ये जाण्यासाठी दोन्हीही टीम्सना विजय आवश्यक आहे. यामुळे ही लढत खऱ्या अर्थाने रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.

Jun 24, 2014, 04:42 PM IST

ब्राझिलच्या नेमारनं केली पेलेच्या विक्रमाशी बरोबरी

फीफा वर्ल्डकपच्या सामन्यात ब्राझिलचा स्टार खेळाडू नेमारनं अप्रतिम खेळ करत कॅमरून विरुद्ध ४-१ अशी मात दिली. या विजयामुळं ब्राझिल त्यांच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी पोहोचला असून नेमारनं देखील महान फुटबॉलपटू पेलेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. यंदा साऱ्यांचंच लक्ष नेमारच्या खेळाकडे लागलंय.

Jun 24, 2014, 03:19 PM IST

फिफा वर्ल्डकप - स्पेनचा धक्कादायक पराभव, नेदरलँड्सची किमया

फिफा वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन स्पेनचा चिलीने धक्कादायक पराभव करत त्यांना पॅक अप करायला भाग पाडल. वर्ल्ड कपमधील हा पहिला मोठा अप सेट ठरला. चिलीने स्पेनला 2-0ने पराभूत करत स्पेनच स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आणलं.

Jun 19, 2014, 08:07 AM IST

फिफा वर्ल्डकप 2014 : पोर्तुगालची मदार रोनाल्डोवर!

पोर्तुगाल आणि जर्मनीमध्ये आज हाय व्होल्टेज मॅच फुटबॉल प्रेमींना पाहायला मिळणार आहे. पोर्तुगालाचा स्टार स्ट्रायकर रोनाल्डो या मॅचमध्ये खेळणार असल्य़ानं जर्मनीची डोकेदुखी वाढली आहे.

Jun 16, 2014, 07:09 PM IST

अपंगत्वावर मात करत `तो` मारणार पहिली किक

यंत्रमानवाप्रमाणं भासणाऱ्या पोलादी वेशात बहुविकलांग व्यक्ती फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात पहिली किक मारणार आहे. अर्धांगवायूच्या झटक्यानंतर व्यक्तीला त्याच्या पायावर उभं करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे

Jun 10, 2014, 09:10 AM IST