good news

दिवाळीच्या तोंडावर भाज्यांचे दर कडाडले

Vegetables Getting Expensive In Festival Season

Oct 10, 2017, 08:48 PM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोनो रेलचा दुसरा टप्पा होणार सुरु

रखडलेल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याला अखेर येत्या डिसेंबरपासून सुरुवात  होण्याची शक्यता आहेत. वडाळा ते सातरस्ता हा मोनो रेलचा दुसरा टप्पा आहे.

Oct 7, 2017, 12:38 PM IST

मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज

मुंबईत लोकल रेल्वेनं प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक गुडन्यूज आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून पश्चिम आणि हार्बर तसंच ट्रान्स हार्बर मार्गावर 60 जादा लोकल फे-या चालवल्या जाणार आहेत. 32 फे-या पश्चिम रेल्वेवर तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रत्येकी 14 फे-या असतील.

Sep 27, 2017, 12:28 PM IST

गुडन्यूज : मध्य रेल्वे ७४ स्थानकांवर बसविणार सरकते जिने

मध्य रेल्वेने येत्या काही महिन्यांत विविध स्थानकांवर ७४ नवीन सरकते जिने बसविण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसाराप्रमाणेच हार्बरवर मार्गावरही सरकते जिने बसवले जाणार आहेत. 

Sep 26, 2017, 11:42 AM IST

मध्य रेल्वेची गुडन्यूज, लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरु करणार

मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी खास सुविधा मिळणार आहे. गर्दीच्या स्थानकांवरून लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरू होणार आहेत. हा प्रवाशांना मोठा दिलासा आहे.

Sep 15, 2017, 04:19 PM IST

एसटीतील पदवीधर वाहकांना सुवर्णसंधी

एस.टी. महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या लिपिक-टंकलेखक पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये एस.टी. च्या वाहकांना काही अटींची पूर्तता करून अर्ज भरण्याची संधी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री आणि मंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. 

Aug 24, 2017, 07:17 PM IST

आदिनाथ-उर्मिलाच्या घरी येणार नवा पाहुणा

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आदिनाथ ठाकरे आणि उर्मिला कानिटकर-ठाकरे यांच्या फॅन्ससाठी गुडन्यूज आहे. या जोडप्याच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. 

Aug 11, 2017, 08:31 PM IST

मुंबईतील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी

या कार्यक्रमाला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि पर्यटन मंत्री रावल उपस्थित होते.

Jul 30, 2017, 08:27 PM IST

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, सरकारने पास केलं महत्त्वाचं बिल

देशातील ४ कोटीपेक्षा अधिक कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. कॅबिनेटने बुधवारी नवीन पगार कोड बिल (किमान वेतन कोड बिल) मंजूर केला आहे. श्रमिक क्षेत्रातील संबंधित चार कायद्यांना एकत्रित करून यामुळे सर्व क्षेत्रात की किमान वेतन निश्चित होईल. प्रस्तावित कायदा पास झाल्यास देशातील चार कोटी कामगारांना याचा फायदा होईल.

Jul 27, 2017, 05:33 PM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात वाढ

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आठवडाभरापासून पावसानं दमदार हजेरी लावलीय. त्यामुळं पाणीसाठा वाढायला लागलाय. तानसा, मोडकसागर, भातसा या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेय.

Jul 18, 2017, 06:06 PM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोडकसागर ओव्हर फ्लो

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

Jul 15, 2017, 11:24 AM IST

गुडन्यूज : स्टेट बॅंकेने या शुल्कात केली ७५ टक्के कपात, उद्यापासून मिळणार फायदा

तुमचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेत खाते असेल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. एसबीआयने इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे (आयएमपीएस) एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठविण्यासाठी लागणारे शुल्क रद्द केले आहे. त्याचबरोबर ७५ टक्के शुल्क कपात केलेय. याचा लाभ हा उद्यापासून मिळणार आहे.

Jul 14, 2017, 11:29 AM IST

रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच विमानसेवा

येथील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. रत्नागिरी विमानतळाचं काम सध्या प्रगतीपथावर असून 2018 मध्ये या विमानतळाची सेवा सुरू होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी दिलीय.

Jul 13, 2017, 08:14 AM IST

ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी खूशखबर

जर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता ऑनलाइन व्यवहारांवर लागणार चार्ज बंद होणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने नेट बँकिंगचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांना खूशखबर दिला आहे.

Jul 12, 2017, 02:05 PM IST