indian national congress

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष तर प्रियंका होणार सरचिटणीस - सूत्र

प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे. सोमवारी प्रियांका गांधींकडे काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

Mar 1, 2015, 04:57 PM IST

शशी थरुर-मेहर तरार फोटो व्हायरल, सुनंदा पुष्कर प्रकरणाला वेगळे वळण

सुनंदा पुष्कर हत्येप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सुनंदा पुष्करचे पती, ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांचा एकत्र फोटोच हाती आलाय.

Jan 13, 2015, 06:34 PM IST

दिल्लीत ७ फेब्रुवारीला मतदान, १० ला निकाल

अखेर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी निवडणूक पार पडणार असून १० फेब्रुवारी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 

Jan 12, 2015, 05:10 PM IST

पाकिस्तान बोट स्फोटासंदर्भात दोन भारतीय नाविकांना अटक

पाकिस्तान बोट स्फोटासंदर्भात दोन भारतीय नाविकांना अटक केली गेलीय. कोस्टगार्डनं दोन्ही नाविकांना अटक केलीय. हे भारतीय नाविक बोट घेऊन पाकिस्तानच्या सीमाभागात घुसले होते. 

Jan 4, 2015, 06:15 PM IST

मराठा-मुस्लिम आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचीही स्थगिती

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका बसलाय. मराठा, मुस्लिम आरक्षण नाकारले सुप्रीम कोर्टानं नाकारले आहेत. हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला असून हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय.

Dec 18, 2014, 12:31 PM IST

दहशतवाद, नक्षलवादाच्या बुलेटला जनतेचं बॅलेटनं उत्तर

दहशतवाद आणि नक्षलवादाच्या दहशतीला दूर सारत लोकशाही मूल्यांवरची निष्ठा आज जम्मू काश्मीर आणि झारखंडच्या जनतेनं दाखवून दिली. जम्मू काश्मीरमध्ये आज विक्रमी मतदान झालं. 

Nov 25, 2014, 10:59 PM IST

पंतप्रधान स्वत: झोपत नाही, आम्हालाही झोपू देत नाही – व्यंकय्या नायडू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक करतांना केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी रविवारी म्हटलं, “ते स्वत: झोपत नाहीत आणि ना आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना तसं करू देत.”

Nov 17, 2014, 08:43 AM IST

धक्कादायक: छत्तीसगडमध्ये नसबंदी शस्त्रक्रियेनंतर ७ महिलांचा मृत्यू

छत्तीसगडमधील बिलासपूर इथल्या एका रुग्णालयात नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतर ७ महिलांचा मृत्यू झाला असून ३२ महिलांची प्रकृती गंभीर आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं सात महिलांना जीव गमवावा लागला आहे. 

Nov 11, 2014, 12:24 PM IST

हरयाणात भाजपला स्पष्ट बहुमत, काँग्रेसचं पानिपत!

महाराष्ट्रासोबतच आज हरयाणात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. इथं भाजपचा भगवा फडकण्याची चिन्हं आहेत. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांपैकी ४७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी असून भाजपला पूर्ण बहुमत मिळालंय. देशातील सत्ता गमावल्यामुळं राजकीयदृष्ट्या कोमात गेलेल्या काँग्रेसला हा जबरदस्त मोठा धक्का मानला जात आहे.

Oct 19, 2014, 07:35 PM IST

दिवाळी कोणाची? सरकार कोणाचं, थोड्याच वेळात निकाल

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्यामुळं राज्यभर जोरदार आतषबाजी होणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूनं कौल दिला आहे, हे अवघ्या काही तासांनंतर कळणार असल्यामुळं निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Oct 19, 2014, 06:32 AM IST

अपडेट: आघाडी राष्ट्रवादीलाच तो़डायचीय - राणे

दुपारी ४.३० वाजता - 

आघाडीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार, आघाडी राष्ट्रवादीलाच तोडायची आहे, नारायण राणेंची रोखठोक भूमिका

दुपारी ३.२५ वाजता - 

मुख्यमंत्री कराडहून आल्यानंतर जागावाटपाबाबत बैठक होणार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

Sep 24, 2014, 10:05 AM IST

मुख्यमंत्री आयसीयूमधील पेशंटप्रमाणे अस्थिर - उद्धव ठाकरे

सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्यानं पृथ्वीराज चव्हाण यांचं मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनलं असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडण्यात आलं असून 'अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तसं काहीसं राज्याच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचं झालं असल्याचं' लेखात म्हटलं आहे. 

Sep 15, 2014, 05:11 PM IST